निरंतर कार्यवाहीमुळे लागली वाहतुकीला शिस्त : वाहनधारकासह नागरिकांतून समाधान निपाणी (वार्ता) : काही महिन्यांपासून निपाणी शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होत आहे. अनेक व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण केल्याने दसरा, दिवाळीसह आठवडी बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना वाहने थांबविण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनधारक रस्त्यावर वाहने लावून तासनतास खरेदी करीत …
Read More »रयत संघटनेचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
ऊस दरासह नुकसान भरपाई मिळावी : राजू पोवार यांचा पुढाकार निपाणी (वार्ता) : यंदाच्या हंगामातील ऊसाला सरकार आणि साखर कारखान्यांनी एकत्र येऊन प्रति टन ५५०० रुपये दर द्यावा. या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे प्रत्येक तालुक्यामध्ये आंदोलन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर धारवाड येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखर कारखान्यानी ५५०० दर द्यावा, या …
Read More »उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा अकोळमध्ये सत्कार
निपाणी (वार्ता) : हुन्नरगी येथील ग्रामपंचायतच्या पोटनिवडणुकीत दिवंगत माजी ग्राम पंचायत उपाध्यक्ष सुनील चौगुले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रतिष्ठेच्या पोटनिवडणुकीत युवा नेते उत्तम पाटील गटाचे समर्थक वृषभ सुनील चौगुले यांचा ९७ मतांनी विजय झालात्याबद्दल युवा नेते उत्तम पाटील फाउंडेशनतर्फे उत्तम पाटील, वृषभ चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तम पाटील …
Read More »मणतुर्गा रेल्वे गेटजवळील कमान हटवली!
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील खानापूर अनमोड रस्त्यावरील मणतुर्गा (शेडेगाळी) रेल्वे गेट जवळील कमान हटवावी अशा मागणीचे निवेदन तहसीलदार प्रविण जैन यांना शेतकऱ्यांनी दिले होते. शिवाय “बेळगाव वार्ता”च्या बातमीची दखल घेत. तसेच बेळगांव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या प्रयत्नाने ही कमान हटविण्यात आली. याबाबतची माहिती अशी की, खानापूर अनमोड …
Read More »खानापूरात भाजपचा आमदार होणार; भाजप नेते किरण यळ्ळूरकरांचा वाढदिवसानिमित्त संकल्प
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात परप्रांतीय उमेदवार येऊन आमदार की भोगतो ही निंदनीय गोष्ट आहे. एकीकडे खानापूर तालुक्यात भाजप कार्यकर्ते गावोगावी सज्ज आहेत. तेव्हा येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत खानापूर तालुक्याचा आमदार भाजपचा झाला पाहिजे, असा संकल्प भाजपचे ज्येष्ठ नेते किरण यळ्ळूरकर यांनी खानापूर येथील भाजप कार्यालय आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून व्यक्त …
Read More »सौंदलगा येथील कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे
सौंदलगा : सौंदलगा ग्रामपंचायतमार्फत बांधण्यात आलेल्या कचरा प्रकल्पाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झालेबद्दल सौंदलगा ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्याकडून ग्रामपंचायत व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार अर्जाचे निवेदन देण्यात आले आले आहे. सौंदलगाव ग्रामपंचायतीमार्फत एन. आर. जी. फंडातून या कचरा प्रकल्पासाठी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या बैठकीमध्ये हा …
Read More »मराठी भाषिकांवरील अन्यायाचा खानापूर समितीकडून जाहीर निषेध!
खानापूर : एक नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने लाक्षणिक उपोषण व निषेध सभा आयोजित करण्यात आली. शिवस्मारक येथे माजी आमदार दिगंबरराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. लाक्षणिक उपोषणाला तालुक्यातील समितीप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ सीमासत्याग्रही नारायण लाड, पुंडलिक मामा चव्हाण, शंकर …
Read More »चिकोडी जिल्हा काँग्रेस विधानसभा क्षेत्रामध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसची भरारी
चिकोडी जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : चिकोडी जिल्हा मतदार संघातील रायबाग विधानसभा मतदारसंघात १४ पैकी १३ जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. तर एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले, अशी माहिती चिकोडी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी निपाणी विश्रामधाम येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. …
Read More »काळ्यादिनी निपाणी कडकडीत बंद
शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त : उघड्यावर सभा घेण्यास मज्जाव निपाणी (वार्ता) : सीमाभागातील मराठी बांधवावर झालेल्या अन्यायाविरोधात लढा देणाऱ्या सीमावासीयांना पाठींबा व मराठी बांधवावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध म्हणून मंगळवारी (ता.१) सीमाभागातील मराठी बांधवांनी बंद पाळला. या बंदला निपाणी शहरातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठी बांधवांनी आपले दैनदिन व्यवसाय बंद ठेवून बंदला …
Read More »सीमाप्रश्नाच्या अखेरच्या लढ्यात तरुणांचा सहभाग महत्त्वाचा
प्रा. डॉ. अच्युत माने : काळ्यादिनी मराठी भाषकांची बैठक निपाणी (वार्ता) : सीमाप्रश्नासाठी सनादशीर मार्गाने लढा देत असताना प्रशासकीय यंत्रणे कडून लोकशाहीचा गळा घोटला जात आहे. घटनेनुसार सर्व भाषकांना बोलण्याचा अधिकार असूनही दडपशाही केली जात आहे. आतापर्यंत मराठी भाषिकांच्या तीन पिढ्या सीमा प्रश्नासाठी बरबाद झाल्या आहेत. सीमाभागातील मराठी भाषिकांची गेल्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta