Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

राज्य सरकारला मोठा धक्का; हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचे आदेश उच्च न्यायालयाने केले रद्द

  बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी २०२२ मध्ये जुन्या हुबळी येथील दंगलीसह ४३ गुन्हेगारी खटले मागे घेण्याचा राज्य सरकारचा आदेश रद्द केला. सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारसाठी हा एक मोठा धक्का आहे. राज्य मंत्रिमंडळाने हुबळी दंगलीसह ४३ खटले मागे घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये, माजी मंत्री, …

Read More »

गोरक्षण सेवा समितीच्या गोरक्षकांना मोठे यश; कागल येथे गोरक्षकाकडून दोन टन हून अधिक गोमांस जप्त

  निपाणी : कोल्हापूर – बेळगाव राष्ट्रीय महामार्ग 4 वर सदर बाजार कोल्हापूर येथून गाडी क्रमांक एमएच 42, एम 6224 या बोलोरो पिकप गाडी मधून 2 टन गोमांसची बेकादेशीररित्या वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाचे प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांना एका गोभक्ताकडून मिळाली. यावेळी प.पू. प्राणलिंग स्वामीजी यांनी गोरक्षण …

Read More »

पूरग्रस्त भागांना भेट देण्याचे मुख्यमंत्र्यांनी दिले पालकमंत्र्यांना निर्देश

  ३०, ३१ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील पावसाने नुकसान झालेल्या भागांना तात्काळ भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे निर्देश जिल्हा प्रभारी मंत्री आणि सचिवांना दिले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर, या महिन्याच्या ३० आणि ३१ तारखेला सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पंचायतींचे कार्यदर्शी आणि जिल्हा प्रभारी सचिवांची बैठक बोलावण्यात …

Read More »

शिवस्वराज संघटनेतर्फे कृषी अधिकाऱ्यांना निवेदन वजा इशारा…

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला आवश्यक त्या खतांचा पुरवठा वेळेत आणि योग्य दरात करण्यात यावा यासाठी शिवस्वराज फाऊंडेशन आक्रमक. खानापूर तालुक्यात मान्सूनला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी व उसाला खते घालण्यासाठी घाई गडबड सुरू आहे. अशा काळात तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला आवश्यक असलेले खत उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबताना दिसत …

Read More »

अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध

  बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र …

Read More »

“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा

  खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …

Read More »

खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी

  बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …

Read More »

भाजप आमदार शिवराम हेब्बार, आमदार एस. टी. सोमशेखर यांची पक्षातून हकालपट्टी

  बेंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विजयपुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हकालपट्टीनंतर भाजप हायकमांडने उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर आणि बेंगळुरूचे यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर या दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा आदेश जारी केला आहे. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी भाजपने जारी केलेल्या व्हिपचे उल्लंघन करून काँग्रेसला …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलासह पाच जणांना ठोकल्या बेड्या

  पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. …

Read More »