Sunday , December 14 2025
Breaking News

कर्नाटक

जिल्ह्यातील १४०० शाळा वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी : माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर

अनेक शाळाखोल्या धोकादायक निपाणी (वार्ता) : चिकोडी आणि बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात पाऊस, महापूर तसेच अन्य कारणामुळे १४०० पेक्षा जास्त शाळा खोल्यांची दुरावस्था झाली आहे. येत्या पावसाळ्याच्या आत सदर खोल्या दुरुस्त कराव्यात. तसे न झाल्यास विद्यार्थ्यांना धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याची माहिती माजी जिल्हा पंचायत सदस्य आणि माजी शिक्षण स्थायी समिती सदस्य …

Read More »

कोगनोळी शेतकऱ्यांचा हेस्कॉमवर मोर्चा

अधिकाऱ्यांना धरले धारेवर : सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी कोगनोळी : हणबरवाडी दत्तवाडी कोगनोळी येथील शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या वेळी या ठिकाणी असणाऱ्या उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. गेल्या महिनाभरापासून परिसरातील विद्युत पुरवठा अखंडित पणे सुरु आहे. त्यामुळे शेतीला पाणी देणे अवघड जात आहे. वीजपुरवठा …

Read More »

संकेश्वरात कोकणची काळीमैना दाखल..

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर बाजारात कोकणची काळीमैना (करवंदे) दाखल झाले आहेत. करवंदे थोडेसे महाग झालेले असले तरी लोक ते खरेदी करुन राणमेव्याचा आस्वाद घेतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. गतवर्षी पाच रुपयाला मिळणारे करवंदे यंदा दहा रुपयाला आणि दहा रुपयांचे करवंदे पंधरा रुपयाला विकत दिले जाताहेत. संकेश्वर बाजारात मोसमी फळातील आंबे, …

Read More »

संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर अय्याचार कार्यक्रम : संजय हिरेमठ

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात तब्बल दिडशे वर्षानंतर प्रथमच विशिष्ट पद्धतीने चिरंजीव नागमल्लीकार्जुन यांचा अय्याचार आणि महेश्वर मंत्रोपदेश कार्यक्रम येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी संकेश्वर श्री महालक्ष्मी समुदाय भवन येथे होत असल्याची माहिती संजय शशीधर हिरेमठ (स्वामी) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे म्हणाले, चि.नागमल्लीकार्जन यांचा अय्याचार आणि …

Read More »

तयारी “ईद-उल-फित्रची”..

संकेश्वर (प्रतिनिधी) : मुस्लिमांचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. पवित्र रमजानचे रोजे, तरहाबी नमाज आणि पाच-सहा दिवसांत होणाऱ्या रमजान ईद (ईद-उल-फित्रची ) जोरदार तयारी चाललेली दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कोरोना महामारीने रमजान ईदची नमाज मुस्लिम बांधवांना ईदगाहवर पडून करता आलेली नाहीयं. यंदा रमजान ईदची नमाज ईदगाहवर पडून करता येणार …

Read More »

भिवशीतील दलित पूरग्रस्तावर अन्याय..

डॉ. आंबेडकर विचार मंच: जिल्हाधिकार्‍यांना निवेदन  निपाणी (वार्ता) : पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेल्या काळामध्ये अनेक कुटुंबे उध्वस्त व बेघर झालेली आहेत. शासनाकडून नुकसान भरपाई देण्यासाठी ए. बी. व सी श्रेणीमध्ये त्याची विभागणी केली आहे. पण निपाणी तालुक्यातील भिवशी गावामध्ये दलित कुटुंबातील अनेक घरे पडलेली असून चुकीच्या पद्धतीने सर्वे करून सी …

Read More »

कल्लाप्पाण्णा आवाडे यांना कर्मवीर पुरस्कार

रावसाहेब पाटील यांची माहिती: बापूसाहेब बोरगाव यांना मरणोत्तर जीवन गौरव  निपाणी (वार्ता) : सांगलीत 14 व 15 मे रोजी होणाऱ्या दक्षिण भारत जैन सभेच्या शंभराव्या अधिवेशनात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना तर जीवनगौरव …

Read More »

पारीश्वाड येथे आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा

खानापूर (प्रतिनिधी) : पारीश्वाड (ता. खानापूर) येथे बुधवारी दि. 27 रोजी सकाळी शिशू अभिवृद्धी योजना खानापूर मलप्रभा स्त्रि शक्ती स्वसहाय्य संघ बँक सोसायटी खानापूर, पारीश्वाड ग्राम पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आंतर राष्ट्रिय महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्ति समावेश कार्यक्रम सरकारी हायर प्रायमरी शाळा पारीश्वाड येथे पार पडला. यावेळी कार्यक्रमात पौष्टीक …

Read More »

कोगनोळीजवळ ट्रकची विद्युत खांबाला धडक

सुदैवाने जीवित हानी नाही कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणाऱ्या कोगनोळी फाट्यावर डिव्हायडरच्या मधोमध असणाऱ्या विद्युत खांबाला ट्रकची धडक बसण्याची घटना मंगळवार तारीख 26 रोजी सायंकाळी आठच्या सुमारास घडली. याबाबत अधिक माहिती अशी की, कोल्हापूरहून बेळगावकडे जाणारा ट्रक येथील कोगनोळी फाट्यावर आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुभाजकाच्या …

Read More »

….तर सीमावर्ती जिल्ह्यात पुन्हा पाळत

मुख्यमंत्री बोम्मई, नियमांचे पालन करण्याचे आवाहन बंगळूर : देशाच्या विविध भागांमध्ये कोविड- १९ च्या ताज्या चिंता आणि साथीच्या संभाव्य चौथ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्राच्या सल्ल्यानुसार राज्याच्या विमानतळांवर आणि सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये खबरदारी आणि पाळत ठेवण्याचे उपाय पुन्हा सुरू केले जातील, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी मंगळवारी सूचित …

Read More »