संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींनी ध्वजारोहण करुन नवा इतिहास रचला आहे. मठाच्या इतिहासात प्रथमच भगव्या ध्वजाबरोबर तिरंगा डौलाने फडकविणाचे कार्य श्रींनी करुन दाखविले आहे. स्वातंत्रदिनी श्री शंकराचार्य संस्थान मठावर श्रींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भक्तगणांनी अभिमानाने राष्ट्रगीत सादर …
Read More »संकेश्वरात उद्या “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे आयोजन
संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात मंगळवार दि. १७ ऑगस्ट २०२२ रोजी एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च (एमबीए) काॅलेजतर्फे “आरंभ” नॅशनल लेवल फेस्टचे भव्य आयोजन करण्यात आल्याची माहिती संचालिका डॉ. विद्या स्वामी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. त्या पुढे म्हणाल्या, गेली सात वर्षे झाली “आरंभ” फेस्टने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी …
Read More »बोरगाव परिसरात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा
निपाणी (वार्ता) : बोरगाव शहर आणि परिसरात विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. बोरगाव येथील अरिहंत सौहार्द संस्थेत कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात झाले. प्राथमिक कृषी पतीने सहकारी संघात अध्यक्ष युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण तर उपाध्यक्ष बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते प्रतिमा पूजन …
Read More »जांबोटीत मोफत आरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर (प्रतिनिधी) : जांबोटी (ता. खानापूर) येथील गुरूदेव फाऊंडेशनच्यावतीने तसेच भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांच्या सौजन्याने अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी आयोजित मोफत आरोग्य तपासणीला जवळपास शंभरहून अधिक रूग्णांनी उपस्थिती दर्शविली होती. उपस्थित भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत व डॉ. कविता अर्जुनराव यांच्याहस्ते दीपप्रज्वलन व फोटो पुजन होऊन कार्यक्रमाचे …
Read More »सौंदलगा येथे स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
सौंदलगा : सौंदलगा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सौंदलगा ग्रामपंचायतमध्ये ग्रा. पं. अध्यक्षा अर्चना कोगनोळे यांच्या हस्ते ध्वजारोहण तर ग्रामपंचायत उपाध्यक्षा सुजाता चौगुले यांच्या हस्ते ध्वज पूजन करण्यात आले. श्री महात्मा बसवेश्वर सौहार्दमध्ये चेअरमन तानाजी वाक्रुसे यांच्या हस्ते ध्वजारोहण व …
Read More »निपाणीत अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष
शहरात विविध उपक्रम : सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल निपाणी (वार्ता) : शहर आणि परिसरात सोमवारी विविध उपक्रमांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा झाला. त्यानिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. येथील नगरपालिका कार्यालयासमोर नगराध्यक्ष जयवंत भाटले यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण झाले. यावेळी उपनगराध्यक्षा नीता बागडे, सभापती राजू गुंदेशा, नगरपालिका …
Read More »कोगनोळीत विविध ठिकाणी स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील, हणबरवाडी, दत्तवाडी येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. चालू वर्षी देशाचा 75 वा स्वातंत्र्य दिन अमृत महोत्सव असल्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावला होता. दोन-तीन दिवसांमध्ये तिरंगा रॅली, जनजागृती आदीसह अन्य विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कोगनोळी हायस्कूल, श्री अंबिका आदर्श …
Read More »बेनाडीतील टकरीत सांगलीचा बकरा प्रथम
संगोळी रायण्णा मंडळातर्फे आयोजन : सायंकाळी मिरवणूक निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील संगोळी रायण्णा युवक मंडळातर्फे संगोळी रायान्ना जयंती निमित्त बेनाडी बिरदेव माळावर आनंद मैदानात आयोजित बकर्याच्या टकरीत सांगली येथील येथील हुसेन पटेल यांच्या बकर्याने प्रथम क्रमांक मिळवला. त्यांना 5 हजार एक रुपयाचे बक्षीस घेऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. …
Read More »शिवमोगा शहरातील चाकूहल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांकडून अटक
शिवमोगा : शिवमोगा येथे काल सावरकर- टीपू सुल्तान फलकावरून उद्भवलेल्या वादादरम्यान प्रेमसिंग नावाच्या तरुणावर चाकूने वार केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी गोळ्या झाडून त्याला ताब्यात घेतले. जबीउल्ला (30, रा. मारनाबीबैलू) याच्यावर पोलिसांनी गोळ्या झाडून अटक केली. पहाटे 2.30 च्या सुमारास तीर्थहळ्ळी रोडवरील नमोशंकर ले-आऊट येथे एकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी अटक …
Read More »सावरकर – टीपू सुल्तान फलकावरून शिवमोगा येथे वाद
शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगा येथे सोमवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यास एका गटाने आक्षेप घेतला. त्या ठिकाणी टीपू सुल्तान यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्याचा प्रयत्न या गटाने केला. त्यावरून दोन गटांत संघर्ष झाल्यानंतर काही तासांनी गांधीबाजार भागात एकास तीक्ष्ण शस्त्राने भोसकण्यात आले. या प्रकारानंतर शिवमोगा शहरात तणाव …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta