बेंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई राज्यातील फ्रंटलाईन कामगारांसाठी कोविड बुस्टर डोस मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांनी बुधवारी सांगितले की, केंद्र सरकारचे मत याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आरोग्य आणि आघाडीच्या कामगारांना अँटी-कोविड लसीचा बूस्टर डोस देण्याच्या मुद्द्यावर झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची स्थिती जाणून घेऊन राज्यातील तज्ञांनी अनुकूलता व्यक्त केली असल्याने …
Read More »सर्व देशातील प्रवाशांची कर्नाटकात चाचणी, क्वॉरंटाईन
तांत्रिक सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय : रोज 2500 विदेशी प्रवाशी बंगळूरू : मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या सूचनेनुसार, राज्य कर्नाटकात येणार्या सर्व देशांतील आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोविड-19 चाचणी करेल. याआधी, ज्या देशांत ओमिक्रॉन व्हेरियंट सापडला आहे अशा देशांतील प्रवाशांसाठी अनिवार्य आरटीपीसीआर चाचणी केली जात होती. आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. …
Read More »बेपत्ता मुलगा सापडला सुखरूप चिखलात!
विजापूर : घरातून बेपत्ता झालेला मुलगा दुसर्या दिवशी चिखलात पण सुखरूप सापडल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावात घडली. मुद्देबिहाळ तालुक्यातील बनोशी गावातील संतोष मादर हा बालक कालपासून घरातून बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी अनेक ठिकाणी शोध घेऊनही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे त्याच्या घरचे चिंतेत होते. संतोष मानसिकदृष्ट्या अस्वस्थ …
Read More »विधानपरिषद निवडणूक; तिरंगी लढतीने चुरस
निपाणीतील 534 मते कोणाच्या पारड्यात : राजकीय तर्कवितर्कांना उधाण निपाणी : येत्या 10 डिसेंबरला विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. जिल्ह्यात तिरंगी लढत होणार असून भाजपचे महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी व लखन जारकीहोळी हे अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सर्वांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. दरम्यान या निवडणुकीत निपाणी तालुक्यात 534 …
Read More »मलप्रभा साखर कारखान्याच्या चौकशीसाठी शेतकर्यांचे आंदोलन
खानापूर (प्रतिनिधी) : एम. के. हुबळी येथील मलप्रभा साखर कारखाना विविध कारणांनी डबघाईत आला असताना सन् 2020-21 सालातील गळीत हंगामातील साखरेचा उतारा कमी दाखवून कारखाना संचालक मंडळाने 18 हजार क्विंटल साखर लाटण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र शेतकरी वर्गाने वेळीच तपास लावून साखर सील बंद केली आहे. ही गंभीर बाब आहे. …
Read More »अमर पोवार व शुभांगी पोवार यांना क्रांतिसूर्य समाजभूषण पुरस्कार जाहीर
कोगनोळी : मत्तीवडे तालुका निपाणी येथील भारतीय सेवा आश्रमचे संस्थापक अमर पोवार व संचालिका शुभांगी पोवार यांना कोल्हापूर येथील क्रांतीसुर्य फाउंडेशनच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. 5 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या निवडीचे पत्र नुकतेच माजी तालुका पंचायत सदस्य प्रीतम पाटील यांच्या हस्ते त्यांना …
Read More »अहो कमालच… दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे!
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद : निपाणीच्या अविनाश मानेचे यश निपाणी : अनेक बालकांमध्ये विविध कौशल्य भरलेली असतात. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्याच्या विकासाला चालना दिल्यास नक्कीच यशाला गवसणी घालण्यास मदत होते. असाच निपाणी येथील 3 वर्षीय बालक अवनीश माने याने केवळ दोन मिनिटात 111 प्राण्यांची नावे सांगितली. त्याची इंडिया बुक ऑफ …
Read More »निपाणीत प्रभाग क्रमांक 31मध्ये समस्यांचा डोंगर
नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन : खराब रस्त्यासह पथदीप नसल्याने अडचण निपाणी : येथील प्रभाग क्रमांक 31 मध्ये नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मुलभूत सुविधा देण्यात कर्मचारी कमी पडत आहेत. त्यामुळे सोमवारी येथील नागरिकांनी शासन नियुक्त नगरसेवक दत्तात्रेय जोत्रे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष जयवंत भाटले यांना निवेदन देत प्रभाग क्रमांक 31मधील …
Read More »जळालेल्या ऊसाला भरपाई न दिल्यास आंदोलन
राजू पोवार : बेनाडीतील ऊस जळीत क्षेत्राला भेट निपाणी : हेस्कॉमतर्फे निपाणी ग्रामीण भागातील शेतीवाडीमध्ये विद्युत खांब आणि विद्युत वाहिन्या बसविण्यात आले आहेत. पण अनेक गावांमध्ये विद्युत वाहिन्या लोंबकळत असल्याने त्याचा धोका ऊस उत्पादक शेतकर्यांना होत आहेत. आतापर्यंत अनेक शेतकर्यांच्या ऊस शॉर्टसर्किटमुळे जळाला आहे. पण त्याची जबाबदारी न घेता विज …
Read More »कर्नाटक प्रवेशाच्या जाचक अटीमुळे प्रवाशांच्या संख्येत घट
सीमा तपासणी नाक्यावर बंदोबस्त कडक : सीमाभागातील नागरिकांना दिलासा कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर वाहनांची गर्दी कमी झाली आहे. कर्नाटकी शासनाच्या जाचक अटीमुळे महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात प्रवेश करणार्या प्रवाशांची गर्दी कमी झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्र व इतर राज्यांतून कर्नाटकात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta