Wednesday , March 4 2026
Breaking News

कर्नाटक

भाजपा युवामोर्चा एससी अध्यक्षपदी गंगाराम भूसगोळ

उपाध्यक्षपदी सचिन सपाटे यांची निवड संकेश्वर (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टी चिकोडी जिल्हा हुक्केरी मंडल युवामोर्चा (एससी) घटक अध्यक्षपदी संकेश्वरचे नगरसेवक गंगाराम भूसगोळ यांची तर (एसटी)घटक उपाध्यक्षपदी युवानेते सचिन सपाटे यांची निवड करण्यात आली आहे. हुक्केरी मंडल सामान्य युवामोर्चा प्रधानसचिव म्हणून युवानेते प्रदीप माणगांवी, सदस्यपदी संदिप दत्तू गोंधळी, संदिप दवडते, …

Read More »

कॅन्सरला घाबरु नका : डाॅ. एस. व्ही. मुन्याळ

संकेश्वर (प्रतिनिधी) : कॅन्सरला घाबरु नका. त्यावर प्रभावी औषधोपचार आहेत. कर्करोगाचे वेळीच निदान झाले की धोका टाळता येणे शक्य असल्याचे बेळगांव जिल्हा वैद्याधिकारी डॉ. एस. व्ही. मुन्याळ यांनी सांगितले. ते संकेश्वर शासकीय रुग्णालय, एनसीडी घटकतर्फे आयोजित कॅन्सर डे कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपस्थितांचे स्वागत विक्रांत रायप्पगोळ यांनी केले. …

Read More »

अंकलेची पाणी समस्या सुटली : रमेश कत्ती

संकेश्वर (प्रतिनिधी) : अंकले ग्रामपंचायतची पाणी समस्या सोडविण्यासाठी आपण केलेले प्रयत्न फलदायी ठरल्याचे माजी खासदार व बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी सांगितले. ते अंकले गाडगी गल्लीतील श्री गणेश जयंती कार्यक्रमात सहभागी होऊन, दोन विद्युत ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करुन बोलत होते. ते पुढे म्हणाले, अंकलेकरांचा पाणी प्रश्न सुटला …

Read More »

गर्लगुंजीच्या वेशीत बस शेडसाठी टाकलेल्या खड्डी, वाळूचा वाहतुकीला अडथळा

खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या वेशीत नव्याने उभारण्यात आलेल्या बस शेडसाठी वाळू, खड्डी व इतर साहित्य लक्ष्मीमंदिराच्या समोर आणून टाकण्यात आले आहे. त्यातच बस शेडचेही काम अर्धवट करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावर टाकलेल्या वाळू, खड्डी व इतर साहित्याची वाहतुकीला तसेच गावच्या नागरिकांना ये-जा करताना याचा त्रास सहन करावा …

Read More »

करंबळच्या शिवारात विद्युत तारांच्या घर्षणाने ठिणगी पडून ३० एकर जमिनीतील ऊस जळून खाक

खानापूर (प्रतिनिधी) : करंबळ (ता. खानापूर) गावच्या शिवारातील विद्युत खांब्याच्या तारांचे घर्षण होऊन आगीची ठिणगी पडून जवळपास २० ते २५ कर जमिनीतील ऊस शुक्रवारी दि. ४ रोजी जळून खाक झाला. याबाबतची मिळालेली माहिती अशी की, करंबळ गावच्या पट्टीतील ऊसाच्या शिवारात शुक्रवारी दुपारी विद्युत खांबावरील ताराचे वाऱ्यामुळे एकमेकाचे घर्षण झाले व …

Read More »

चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जिम उद्यापासून पूर्ण क्षमतेने सुरू उच्चस्तरीय बैठकीत निर्णय

सावधगिरीच्या उपाययोजना कायम बंगळूर : कोविड-१९ प्रकरणांची सध्याची स्थिती आणि हॉस्पिटलायझेशनचे प्रमाण विचारात घेऊन राज्य सरकारने उद्या (ता. ५) पासून जिम, योग केंद्र, सिनेमा हॉल आणि स्विमिंग पूल पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, ओमिक्रॉन प्रकाराच्या प्रसारामुळे तिसरी लाट डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली, तेव्हा हे …

Read More »

संकेश्वरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी

संकेश्वर (प्रतिनिधी) :  संकेश्वर परिसरातील सर्वच श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. मठ गल्ली गजानन मंदिर सांस्कृतिक भवन येथे श्री गणेश जयंती साजरी करण्यात आली. श्री गणेश जयंती निमित्त येथे पुरोहित नरेंद्र उपाध्ये यांनी पूजा अभिषेक करुन महाआरती सादर केली. त्यांनी सकल भक्तगणांना सुख शांती …

Read More »

संकेश्वर अंकले रस्ता शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम

  संकेश्वर (प्रतिनिधी) : येथील अंकले रस्ता कन्नड उच्च प्राथमिक शाळेत हळदीकुंकू कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. शाळा सुधारणा समिती, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. शालेय मुलींनी आपल्या आईची पाद्यपूजा करुन आर्शीवाद घेतला. सभेत शिक्षिकांनी उपस्थित मातांची ओटी भरुन हळदीकुंकू कार्यक्रम पार पाडला. सभेत सीआरपी एम. …

Read More »

संकेश्वर कमतनूर वेसीत तोबा गर्दी…

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर शुक्रवार आठवडी बाजार दिवशी कमतनूर वेस, सुभाष रस्ता आणि बाजार पेठेत होणारी गर्दी लक्षात घेऊन वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं माजी खासदार रमेश कत्ती यांनी राणी चन्नम्मा मार्केट यार्डमध्ये भाजी बाजार भरविणेचा घेतलेला निर्णय अगदी योग्य असल्याची चर्चा आज बाजारात लोकांतून होताना दिसली. …

Read More »

बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट देणाऱ्यांवर कारवाई

निपाणी : कोगनोळी येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी बनावट आरटीपीसीआर रिपोर्ट तयार करुन देणाऱ्यावर निपाणी पोलिसांनी कारवाई केली. याबाबत अधिक माहिती अशी की, येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर दूधगंगा नदीवर कर्नाटक सीमा तपासणी नाका सुरू आहे. महाराष्ट्र व इतर राज्यांतून …

Read More »