Wednesday , December 10 2025
Breaking News

कर्नाटक

महाराष्ट्र एसटीला कर्नाटकात प्रवेश द्या

कागल तालुका शिवसेनेची मागणी : मंडल पोलीस निरीक्षक शिवयोगी यांना निवेदन निपाणी (वार्ता): महाराष्ट्रातील एस.टी.ना कर्नाटकात प्रवेश द्यावा, अशा मागणीचे निवेदन कागल तालुका शिवसेनेच्या वतीने निपाणीचे मंडल पोलीस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांना देण्यात आले. निवेदनातील माहिती अशी, कर्नाटक निपाणी सीमाभागात असलेल्या महाराष्ट्रातील कागल तालुक्यातील हमिदवाडा, कौलगे, बस्तवडे, चिखली, लिंगनूर, मुरगुड, …

Read More »

निपाणीत पावसाचा हाहाकार!

घराघरात पाणी : घरांच्या भिंतीनाही पाणी निपाणी : आठवडाभर उन्हाचा तडाखा बसून सोमवारी (ता. 11) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पडलेल्या मुसळधार पावसामुळे निपाणी शहर आणि परिसरात हाहाकार माजला. तासभर पडलेल्या पावसामुळे शहरातील शिवाजीनगर सहाव्या गल्लीतील अनेक घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. हे पाणी बाहेर काढण्यासाठी नागरिकांची मोठी तारांबळ …

Read More »

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल 55.54 टक्के

बेंगळुरू : अलिकडेच झालेल्या 2021चा दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी निकाल जाहीर केला आहे. एकूण 53 हजार 155 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व 55.54 टक्के निकाल लागला. 27 आणि 29 सप्टेंबर रोजी दोन दिवस दहावीची पुरवणी …

Read More »

दसर्‍यानंतर पहिली ते पाचवी शाळा भरविण्याची तयारी!

बेंगळुरू : दसरा संपताच राज्यातील शाळांत पहिली ते पाचवीचे प्राथमिक वर्ग भरविण्याची संपूर्ण तयारी सरकारने पूर्ण केली आहे. माध्यान्ह आहारासह सर्व आवश्यक तयारीपूर्ण केल्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बेंगळूर येथे सोमवारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिक्षणमंत्री नागेश म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कोविड तांत्रिक सल्ला समितीची बैठक …

Read More »

वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून त्वरित नुकसान भरपाई द्या

खानापूर युवा समितीचे उप वन संरक्षणाधिकाऱ्याना निवेदन आंदोलनाचा इशारा खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यात वनप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान होत आहे. हातातोंडाला आलेल्या पिकांची अशी नासाडी होत असल्याने शेतकरी हतबल झाला असून वनखात्याने त्वरित वनप्राण्यांचा बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदनत खानापूर तालुका म. ए. युवा समितीकडून उप …

Read More »

बोरगाववाडी येथे 12 रोजी शिवलीला पाटील यांचे कीर्तन

निपाणी : बोरगाववाडी येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम मंगळवारी (ता.12) सायं. 7 वाजता आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष विजय माने यांनी दिली. नवरात्र उत्सवानिमित्त श्री नवदुर्गा कला कला-किडा व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने …

Read More »

‘त्या’ आयटी धाडींमागे राजकारणाचा हेतू : माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या

म्हैसूर : सध्या राज्यभर सुरु असलेल्या आयटी धाडीसंदर्भात माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शंका उपस्थित केली असून आयटी धाड टाकण्यामागे राजकीय हेतू असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय. म्हैसूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी सिद्धरामय्यांनी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना बी. एस. येडियुराप्पा यांचे आप्तस्वकीय विजयेंद्र यांच्यावरील आयटी विभागाच्या कारवाईसंदर्भात संशय व्यक्त केला …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमुर्तीपदी रितू राज अवस्थी

बंगळूर : कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती म्हणून रितू राज अवस्थी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज 13 राज्यांच्या उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायमूर्तींच्या नियुक्तीवर सही केली. केंद्र सरकारच्या अतिरिक्त मुख्य सचिवांनी आज हे अधिसूचित केले. सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केल्यानुसार ही अधिसूचना जारी करण्यात आली. अलाहाबादस्थित न्यायमूर्ती …

Read More »

भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या इमारतीसाठी ‘अरिहंत’तर्फे 5 लाख रुपये!

सहकाररत्न रावसाहेब पाटील : नूतन वास्तू उभारणी सभेत घोषणा निपाणी : कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या नूतन स्ववास्तु उभारणी संदर्भात विद्यापीठात सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोरगाव येथील सहकाररत्न आणि दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेबपाटील (दादा) यांनी या इमारतीसाठी पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा …

Read More »

विद्युत खांब बसवताना कंत्राटी मजुराचा मृत्यू

निपाणी : येथील हालसिद्धनाथ सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात नवीन विद्युत खांब व वाहिन्या बसवताना कंत्राटी मजूर खांबावरून खाली पडून वाहिन्यांमध्ये अडकल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता.9) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. मनोहर सदाशिव हलगेकर (वय 40 रा. धूळगोणवाडी) असे या मजुराचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी, …

Read More »