Sunday , September 20 2026
Breaking News

हदनाळ ते निपाणी बस सेवा सुरू

Spread the love

ग्रामस्थांतून समाधान

कोगनोळी : गेल्या अनेक दिवसापासून निपाणी हदनाळ बस सेवा बंद असल्याकारणाने नागरिकांसह विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. ही बस सेवा सुरू झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवार तारीख 28 रोजी सकाळी आठ वाजता येथील मुख्य बस स्थानकावर मान्यवरांच्या हस्ते बसचे पूजन करण्यात आले.

निपाणी तालुका मार्केटिंग कमिटी चेअरमन आनंदा यादव यांनी स्वागत करुन प्रास्ताविकात मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून निपाणी हदनाळ बस सेवा सुरू झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही बस सेवा बंद असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांचे मोठे हाल होऊ लागले होते. बस सुरू करण्यात यावी या मागणीसाठी मंत्री शशिकला जोल्ले व खासदार आण्णासाहेब जोल्ले यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकारी यांच्याशी बोलून बससेवा सुरू करून दिल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
यावेळी हदनाळ भाजपाध्यक्ष रंगराव शेटके, पिंटू पाडेकर, ग्रामपंचायत सदस्य तुकाराम शेटके, अमोल काळे, सुधाकर राऊत, केरबा पाटील, राजाराम पाटील, दिलीप शेटके, दशरथ पाटील, सागर पाटील, बाळासाहेब शेटके, निवास मगदूम, सुधीर पाटील, नामदेव पाडेकर यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *