Monday , May 25 2026
Breaking News

कोगनोळी अर्धवट अंगणवाडी बांधकामाची अधिकारी यांच्याकडून पाहणी

Spread the love

कोगनोळी :  येथील कोगनोळी हणबरवाडी, कुंबळकट्टी व आंबेडकरनगरमधील अर्धवट बांधकाम असलेल्या अंगणवाड्यांची निपाणीचे सीडीपीओ सुमित्रा डी. बी. यांनी पाहाणी केली.
तीन अंगणवाड्यांची बांधकामे गेल्या 4 वर्षापासून बंद आहेत. कामाची बीले निघुनीही अर्धवटच आहेत.
वाड्या-वस्त्यामधील लहान मुलांची शिक्षणाची सोय व्हावी म्हणून हणबरवाडी, कुंबळकट्टी व आंबेडकर नगरमध्ये कर्नाटक शासनाच्या मनरेगा योजनेतून एका अंगणवाडी इमारतीसाठी दहा लाख रुपये असे तीन अंगणवाडी इमारतीच्या बांधकामासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर केलेला होता.
तीन वर्षे कामास सुरुवात करूनही आज आखेर या अंगणवाडी इमारतीचे काम अर्धवटच असून या झालेल्या बांधकामांची बीलेही कंत्राटदाराने काढून घेतलेली असल्याचे समजते. याची दखल घेऊन अभिवृद्धी योजना अधिकारी सुमित्रा डी. बी. व निरिक्षक राजश्री भाडाळे व निपाणी तालुका पंचायत निर्देशक कोतवाल, ग्राम विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी पाहाणी केली.
अंगणवाड्यांच्या समस्या जाणून घेऊन संबंधित ठेकेदारांना अंगणवाडीची उर्वरित अर्धवट राहिलेली बांधकामे आठ दिवसात सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

अंगणवाडी बांधकामाचा ठेका घेतलेल्या कॉन्ट्रॅक्टर सदस्यांना तेथील ग्रामस्थांनी व अंगणवाडी शिक्षकाने मुलांच्या शिक्षणात गैरसोय होत असून या अंगणवाडीचे काम लवकरात लवकर पूर्ण करून देण्याची मागणी पालक वर्ग व अंगणवाडी शिक्षका यांचेकडून यावेळी करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य युवराज कोळी, कृष्णात खोत, सुनील माने, आप्पासाहेब खोत, संजय खोत, सचिन चौगुले यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आप्पाचीवाडी पुलासाठी आरपारची लढाई; रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पोवार

Spread the love  २८ रोजी पाटबंधारेसह तालुका पंचायत कार्यालयाला टाळे ठोकणार निपाणी (वार्ता) : आप्पाचीवाडी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *