फुलांना आले सुगीचे दिवस : बाजारपेठेत फुलांची आवक वाढली निपाणी : गत वर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक लग्नाचा बार मोजक्या लोकांच्या उपस्थितीत उरकावा लागला. अनेकांनी धुमधडाक्यात लग्न लावण्याचा बेत ठेऊन लग्न पुढे ढकलले. गत वर्षीपासून थांबलेल्या या वधुवरांच्या लग्नाचा बार उडण्यास सुरुवात झाली असून लग्नसोहळ्या प्रसंगी फुलांच्या मागणीत वाढ झाली …
Read More »खानापूरच्या विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर शहराच्या उपनगरातील विद्यानगरात रस्ता, गटारीच्या समस्या नेहमीच भेडसावित आहे. याकडे खानापूर नगरपंचायतीचे तसेच या भागाच्या नगरसेवकांचे साफ दुर्लक्ष होत आहे. विद्यानगरातील रहिवाशाना गेल्या कित्येक वर्षापासून रस्ताच नाही. त्यामुळे सर्वत्र खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळ्यात विद्यानगरात रस्त्यावर चिखलातून ये-जा करणे सर्वानाच त्रासाचे झाले आहे. विद्यानगरात गटारीची समस्या …
Read More »स्थानिक बेरोजगार तरुणांना व्यवसायात प्राधान्य द्यावे
राजू पोवार: जिल्हाधिकार्यांकडे मागणी निपाणी : सरकारने अनेक ठिकाणच्या भुखंडावर परप्रांतीयांना जागा देवून आणि वीज व पाणीपुरवठा सोयीसवलती कमी दर देवून त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे किराणा दुकान, हार्डवेअर, सॅनिटरी, मोबाईल शॉप, बांधकाम व्यावसायिक, फळे व भाजीपाला, फर्निचर, मिठाई, हॉटेल, कापड उद्योग अशा सर्वच ठिकाणी परप्रांतीयांचे जाळे निर्माण …
Read More »रावसाहेब पाटील यांच्यामुळे द. भा. जैन सभेचे कार्य तळागळापर्यंत
आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर : अधिवेशनाच्या बोधचिन्हाचे अनावरण निपाणी : दिवाण बहादुर अण्णासाहेब लठ्ठे यांनी स्थापन केलेल्या दक्षिण भारत जैन सभेला रचनात्मक कामातून सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सभेचे कामकाज पोहोचवले. एका राज्यासाठी किंवा एका जिल्ह्यासाठी सभेचे कामकाज मर्यादित न ठेवता कर्नाटक व महाराष्ट्र दोन्ही राज्यातील …
Read More »खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी, विद्यार्थी वर्गाची गैरसोय
खानापूर (प्रतिनिधी) : गेल्या वर्षभरापासून खानापूर-बेळगाव बससेवा अपूरी असल्याने खानापूरहून बेळगावला ये-जा करणार्या विद्यार्थी वर्गाचे तसेच नोकरवर्गाचे आतोनात हाल होत आहेत. सकाळच्यावेळी कॉलेज विद्यार्थी बसला लोंबकळत जाताना दिसत आहेत. इतकी बस प्रवाशानी बरलेली असते. अशावेळी विद्यार्थी लोंबकळत जाताना पडला तर याला जबाबदार कोण? असा सवाल पालक वर्गातून विचारला जात आहे. …
Read More »कर्नाटकातील चार जिल्ह्यात हायअलर्ट : कोविड स्थितीवर केंद्राचा इशारा
बंगळूर : कर्नाटकच्या आरोग्य विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये प्रचलित कोविड परिस्थितीवर दक्षता वाढवली आहे, कारण केंद्र सरकारने एका पत्राद्वारे या जिल्ह्यांमध्ये वाढत्या प्रकरणांचा इशारा दिला आहे आणि राज्य सरकारला कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव, राजेश भूषण यांनी राज्याला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे …
Read More »नंदगडच्या जंगलात बिबट्याच्या हल्ल्यात बैलाचा बळी
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील नंदगड गावच्या दुर्गादेवी (आनंदगड किल्ला) मार्गावर डॅमच्या बाजूला शेतवडीत बिबट्या वाघाच्या हल्ल्यात बैलाचा बळी गेल्याची घटना शनिवारी दि. 4 रोजी घडली. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, नंदगड येथील शेतकरी सुरेश चंद्रकांत रामगुरवाड्डी हे आपली जनावरे घेऊन शेतकामासाठी शेताकडे गेले होते. यावेळी बिबट्या वाघाने बैलाचा फडशा …
Read More »कर्नाटक-महाराष्ट्र सीमा तपासणी नाक्यामुळे प्रवासी वर्गाचे हाल
बंदोबस्त कडक : ना ईकडचे ना तिकडचे कोगनोळी : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणार्या दुधगंगा नदी जवळ कर्नाटक सीमा तपासणी नाका व कागल येथील नव्याने बांधण्यात आलेल्या आरटीओ ऑफिस येथे महाराष्ट्राचा सीमा तपासणी नाका सुरू आहे. या दोन्ही सीमा तपासणी नाक्यामुळे कर्नाटकातून महाराष्ट्रात जाणे व महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणार्या प्रवाशांना …
Read More »शाळातील सभा-समारंभांवर बंदी, विवाहात 500 लोकांची मर्यादा
नवीन कोविड नियंत्रण नियमावली जारी, उच्चस्तरीय बैठकीत निर्णय बंगळूरू : कर्नाटकातील ओमिक्रॉनच्या शोधाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता.3) उच्चस्तरीय बैठक घेऊन कोविड नियंत्रणासाठी कांही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. राज्यातील कोविड चाचणीचा वेग वाढविण्याबरोबरच शाळातील सभा, समारंभांवर बंदी घालण्यात येणार आहे. विवाह समारंभात केवळ 500 लोकांनाच सहभागाची परवानगी …
Read More »कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त
बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली. दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta