Sunday , September 20 2026
Breaking News

हिरण्यकेशी मैली हो गई….

Spread the love


संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर हिरण्यकेशी नदीचे पाणी काळेकुट्ट झालेले दिसत आहे. नदीचे प्रदुर्षण थांबविण्याचे कार्य कोण करणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. उन्हाळ्यात हिरण्यकेशी नदी पात्रातील पाणी ओसरू लागले की नदीचं गाळ आणि गढूळ पाणी लोकांच्या नजरेत पडते. मग नदी प्रदूषित झाल्याची लोकांत चर्चा सुरू होते. यापूर्वी नांगनूररांनी हिरण्यकेशी नदी पात्रात कारखान्याने मळी मिश्रीत पाणी सोडू नये यासाठी आवाज उठविला होता. नदीत ओढ्याचे आणि गावातील गटारीचे सांडपाणी थेट मिसळते. याचा बंदोबस्त पालिका केंव्हा करणार कोण जाणे. यापूर्वी हिरण्यकेशी नदी पात्रातील वाळू उपसा करुन लोक त्याचा उपयोग गावातील घर बांधकामासाठी करायचे. पण अलीकडे शासनाने वाळू उपसा करणेस मनाई केली आहे. त्यामुळे नदीचे पात्रात वाळू भरमसाठ साचून राहिलेली दिसत आहे. हिरण्यकेशी नदीचे गाळ काढण्याचे काम राहून गेल्यामुळे तसेच नदी पात्रातील छोट्या-मोठ्या पूलांच्या अडथळ्यांमुळे गेल्या वर्षी नदीला महापूर आल्याचे जाणकार सांगताहेत. हिरण्यकेशी नदी स्वच्छता मोहिम राबवून नदीचे प्रदुर्षण टाळण्याचे कार्य कोणीतरी हाती घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हिरण्यकेशी नदी पात्रातील गढूळ पाणयाचा उपयोग सध्या कपडे धुण्यासाठी तसेच जनावरांना पाणी पाजणेसाठी केला जात आहे.संकेश्वरकरांनो तुमची हिरण्यकेशी नदी मैली झाली आहे. इकडे लक्ष देणार काय? नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, उपनगराध्यक्ष अजित करजगी, सभापती सुनिल पर्वतराव आणि सर्व‌‌‌ पालिका सदस्यांनी हिरण्यकेशी नदी पात्रातील गाळ काढण्याचा विषय आतातरी गांभीर्याने घ्यायला हवा असल्याचे लोकांतून सांगितले जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गजानन महाराज संजीवन समाधी मंदिरात ५६ प्रकारचा नैवेद्य

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील रोहिदासनगरमध्ये असलेल्या गजानन महाराज मंदिरात संत गजानन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *