Monday , September 21 2026
Breaking News

माऊली फाऊंडेशनतर्फे महिला दिन साजरा

Spread the love
निपाणी(वार्ता) : महिला दिनाचे औचित्य साधून माऊली फाऊंडेशन व ममता संघाच्या संयुक्त विद्यमाने येथील संत नामदेव मंदिरात महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सुषमा बेंद्रे उपस्थित होत्या.
 माऊली फाऊंडेशनचे अध्यक्ष सुनील राउत यांनी स्वागत केले. येथील महात्मा गांधी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सीमा गुंजाळ , ऍड. सुषमा बेंद्रे, प्राचार्य मनीषा महाजन, छाया कोपार्डे, अंजना कुंभार  यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी माउली फाऊंडेशनच्या वतीने ऍड. सुषमा बेंद्रे यांच्यातर्फे कोरोना वारिअर्सचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास सविता कुंभार, छाया कुंभार, प्रियंका राऊत, विद्या लोहार, दिपाली चौगुले, संपदा चव्हाण, सुमन पारळे, ममता संघटनेच्या अध्यक्षा अंजना कुंभार, रूपाली निकम, जयश्री खाडे, सुवर्णा कांबळे व  महिला  उपस्थित होत्या.

About Belgaum Varta

Check Also

प्रत्येक क्षेत्रातील अभियंत्यांचे योगदान महत्त्वाचे

Spread the love  जयश्री पाटील ; निपाणीत अभियंता दिन कार्यक्रम निपाणी (वार्ता) : अभियंता म्हणजे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *