बेळगाव : समाजातून स्पर्धात्मक परीक्षातून यश मिळून युपीएससी सारखे अधिकारी बनले पाहिजेत, मराठा समाजातील तरुणाई व्यसन आणि मोबाईलच्या जाळ्यात अडकलेली आहेत त्यांना परत मार्गावर आणण्याची गरज आहे. समाज म्हणून आपलं हे कर्तव्य आहे आणि आपण ते पार पाडले पाहिजे, असे मत काडा अध्यक्ष युवराज कदम यांनी व्यक्त केले. रविवारी …
Read More »विभागीय फुटबॉल स्पर्धा : बेळगाव, चिकोडी, बागलकोट अंतिम फेरीत
बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्रबोस लेले मैदानावर टिळकवाडी सार्वजनिक शिक्षण खात्याच्या विभागीय स्तरीय प्राथमिक मुला मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत उद्घाटनच्या दिवशी बेळगांव, चिकोडी, बागलकोट यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सकाळी 10.00 वाजता स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, जिल्हा शारीरिक शिक्षणाधिकारी जुनेद पटेल, उद्योजक …
Read More »म्हैसूर दसरा जंबो सवारी मिरवणुकीतील बेळगावच्या मायाक्कादेवी चित्ररथाला तिसरा क्रमांक
बेळगाव : म्हैसूर येथील ऐतिहासिक जंबो सवारी मिरवणुकीत एकूण ५८ स्थिरचित्रांनी मिरवणुकीत भाग घेतला होता. त्यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील श्री महाकाली मायाक्कादेवी मंदिर चिंचलीची देवस्थानची खासियत दर्शविणाऱ्या चित्ररथाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. ऐतिहासिक जम्बो सवारी मिरवणुकीत सादर करण्यात आलेल्या, बेळगावच्या चित्ररथात, मायाक्का मंदिराचा इतिहास, देवीचे महत्त्व आणि देवी झोपलेल्या पाणथळ …
Read More »भाषा टिकली तरच संस्कृती टिकेल : प्रा. महादेव खोत
बेळगाव : “आपली संस्कृती टिकवायची असेल तर प्रथम भाषा टिकली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने मुलांना मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. मुलांना आपली संस्कृती समजावून सांगितली पाहिजे. वाचनालयातील पुस्तके मुलांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे” असे विचार आरपीडी महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्राध्यापक महादेव खोत यांनी बोलताना व्यक्त केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात …
Read More »सकल मराठा समाजाच्या वतीने खेळाडू आणि श्रुती पाटीलचा सत्कार
बेळगाव : कित्येक दशकानंतर बेळगावचे नाव कुस्ती क्षेत्रात उज्वल करत मैसूर दसरा स्पर्धेत ‘दसरा कर्नाटक कंटीराव केसरी 2025’ हा पुरस्कार मिळवलेल्या पैलवान कामेश पाटील यांच्यासह या स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या दहा युवा पैलवानांचा आणि कर्नाटक राज्य पोलीस दलाच्या पोलीस उपनिरीक्षक स्पर्धेत यश मिळवलेल्या श्रुती पाटील यांचा सत्कार सकल मराठा …
Read More »म. ए. युवा समिती आयोजित वक्तृत्व स्पर्धा यशस्वी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहाचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धा लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न झाली. ही स्पर्धा तीन विभागात संपन्न झाली. ज्येष्ठ व्यंगचित्रकार जगदीश कुंटे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मूर्तीचे पूजन समिती नेते रमेश पावले …
Read More »खडक गल्ली मिरवणूक दगडफेक प्रकरणी 50 जणांवर गुन्हा
बेळगाव : शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील खडक गल्ली परिसरात दोन गटात धार्मिक वाद उसळून दगडफेकीची घटना घडली होती. शुक्रवारी मेहबूब सुभानी दर्ग्याची उरूस मिरवणुक दरवर्षी शनिवार खुट आणि जालगार गल्ली मार्गे मिरवणूक काढण्यात येते. मात्र यावर्षी परवानगी शिवाय खडक गल्लीत मिरवणूक आल्यामुळे दोन गटात शाब्दिक बाचाबाची झाली त्याचे पर्यावसन …
Read More »नेताजीराव जाधव अमृत महोत्सवाला जयंत पाटील उपस्थित राहणार
बेळगाव : बेळगावच्या सामाजिक सहकार राजकीय क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे एक ज्येष्ठ सदस्य आणि माजी नगरसेवक श्री नेताजीराव जाधव यांचा अमृत महोत्सव 15 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी अर्थमंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »काकती येथील आजारी वृद्धाचा तोल जाऊन रस्त्यावरच मृत्यू!
बेळगाव : आजाराने त्रस्त असलेल्या एका वृद्धाचा जिल्हा रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतत असताना तोल जाऊन रस्त्यावर पडल्याने जागीच मृत्यू झाला. बेळगावच्या किल्ला तलावाजवळ ही करुण घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री बेळगाव शहरातील किल्ला तलावाच्या किल्ल्यासमोर हा प्रकार घडला, मृताची ओळख काकती गावचे गणपती पाटील (वय ६५) अशी पटली …
Read More »बेळगावच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
बेळगाव : बेळगाव मधील नागरिकांची दीर्घकाळची मागणी असलेल्या शासकीय सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते झाले. बेळगाव मधील जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात निर्माण झालेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय, गृह वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वस्तीगृहाचे कोनशिला, स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या शहर बस स्थानकाचे उद्घाटन आणि राणी चन्नम्मा विद्यापीठांतर्गत निर्माण होणाऱ्या इमारत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta