Sunday , December 7 2025
Breaking News

बेळगाव

खा. धैर्यशील माने, विजय देवणे, संजय पवार यांना बेळगावात प्रवेशबंदी!

  बेळगाव : एक नोव्हेंबर राज्योत्सव दिनाच्या दिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळा दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हातकणंगलेचे खासदार तसेच तज्ञ समितीचे अध्यक्ष धैर्यशील माने, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे नेते विजय देवणे, संजय पवार यांना बेळगाव जिल्ह्यात प्रवेश बंदी केली आहे. बेळगावात भाषिक तेढ निर्माण होऊ नये त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था …

Read More »

अविनाश कोरेचा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत चमकदार ठसा

  बेळगाव : अंजनेय नगर येथील आणि एन.के. एज्युकेशन फाउंडेशन कॉलेजचा विद्यार्थी अविनाश कोरे याने नुकत्याच पदवीपूर्व शिक्षण मंडळाद्वारे आयोजित राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अविनाशने आपल्या दमदार प्रदर्शनातून ५० मी. बटरफ्लाय, १०० मी. बटरफ्लाय आणि २०० मी. बटरफ्लाय या तिन्ही प्रकारांमध्ये रौप्यपदक पटकावले. …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण समिती येळ्ळूरच्या कार्यकर्त्यानी १ नोव्हेंबर मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

  येळ्ळूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात सामील होण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती जे जे लढे पुकारील त्या सर्व लढ्यात येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते अग्रभागी असतील. 1 नोव्हेंबर 1956 पासून आजतागायत आपण सर्व जण एक सैनिक म्हणून लढतो आहोत आणि तोच वसा तोच बाणा दाखविण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने एक दिवस आपले व्यवहार …

Read More »

राज्योत्सव पुरस्कार देण्यावरून मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांना कन्नड संघटनांचा विरोध

  बेळगाव : बेळगावच्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यादव यांना यंदाचा कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मात्र या निर्णयावर बेळगाव जिल्हा कन्नड क्रिया समितीने विरोध केला असून या राज्योत्सव पुरस्काराच्या निवडीला बेळगाव जिल्हा क्रिया समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी यांनी मुख्यंमत्री सिद्धरामय्या आणि मंत्री एच. …

Read More »

बालिका आदर्श विद्यालयाचा कबड्डी संघाचा विभागीय स्पर्धेत दुसरा क्रमांक

  बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बागलकोट यांच्या वतीने बेळगाव विभागीय स्तरीय कबड्डी स्पर्धा जमखंडी तालुक्यातील चिमर्ड येथे संपन्न झाल्या. यामध्ये माध्यमिक गटात बालिका आदर्श विद्यालयाने उपांत्य सामन्यात सिरशी जिल्ह्याला 17-21 अशा फरकाने हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना बागलकोट सोबत झाला यामध्ये 10-19 अशा फरकाने पराभव पत्करला व …

Read More »

शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांना कर्नाटक राजोत्सव पुरस्कार जाहीर

  बेळगाव : येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या विद्यमान अध्यक्षा डॉ. राजश्रीताई नागराजू यांना कर्नाटक सरकारचा शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी दिला जाणारा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून या पुरस्काराने बेळगाव येथील मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या मुकुटात मानाचा तुरा रोवला गेला आहे! मराठा मंडळ ही कर्नाटकातील भाषिक अल्पसंख्याक अग्रगण्य शिक्षण संस्था …

Read More »

काळ्या दिनानिमित्त बेळगावात सायकल फेरी व जाहीर सभेचे आयोजन; सहभागी होण्याचे बेळगाव शहर आणि तालुका समितीचे आवाहन

बेळगाव : भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक नोव्हेंबर 1956 मध्ये भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना झाली याच दिवशी पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव कारवार आणि हैदराबाद मधील बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश त्या वेळेच्या म्हैसूर राज्यात घालण्याची शिफारस राज्य पुनर्रचना आयोगाने जाहीर केली होती. मराठी भाषिकावर झालेला हा अन्याय दूर करून घेण्यासाठी …

Read More »

काळा दिन गांभीर्याने पाळा; बेळगाव तालुका समितीचे आवाहन

  बेळगाव : १ नोव्हेंबर हा सीमाभागमध्ये मराठी भाषिक काळा दिन म्हणून गेली ६९ वर्षे पाळत आहेत. १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग राज्य पुनर्रचनेवेळी केंद्र सरकारने अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यामध्ये डांबण्यात आला आहे. तेव्हापासून सीमाभागातील मराठी भाषिक केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी हा दिवस …

Read More »

कर्नाटकी पोलिसांची दांडगाई; शुभम शेळकेंवर पाच लाख दंडाची कारवाई

जिल्हा सत्र न्यायालयात वकील महेश बिर्जे यांनी दिले आव्हान बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती सीमाभागचे अध्यक्ष व युवा नेते श्री. शुभम शेळके यांना बेळगाव पोलीस प्रशासन येनकेन प्रकारे अडकवण्याचा डाव आखत आहे, यावेळी त्यांनी नवीन डाव आखला असून प्रतिबंधात्मक सूचनेचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून माळमारुती पोलीस स्थानकाच्या शिफारशी वरून तब्बल …

Read More »

काळ्या दिनाच्या मूक मोर्चात महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हा; म. ए. समिती महिला आघाडीचे आवाहन

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीने येत्या १ नोव्हेंबर रोजी पाळल्या जाणाऱ्या ‘काळा दिना’संदर्भात नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. सन १९५६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आकाशवाणीवरून कर्नाटक राज्याच्या स्थापनेची घोषणा केली आणि हा न्याय्य सीमाभाग कर्नाटकात जबरदस्तीने डांबण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत सीमाभागातील २५ लाखांहून …

Read More »