बेळगाव : कडोली येथील एका तरुणाने मानसिक ताण-तणावातून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली आहे. आठवड्याभरात गावातील ही दुसरी घटना असल्याची चर्चा सुरू झाली आहे. संतोष रमेश हंपन्नावर (वय २९ लक्ष्मी गल्ली, कडोली) असे त्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याच्या पक्षात पत्नी, दोन मुली, एक भाऊ, असा परिवार आहे. …
Read More »संजीवीनीच्या क्रीडामहोत्सवात उमटला आनंदाचा नवा सूर
बेळगाव : खेळाचा आनंद, आपुलकीचा स्पर्श आणि आत्मविश्वासाची नवी उभारी या तिन्हींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले ते संजीवीनी फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात. काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आयोजित केलेला हा क्रीडामहोत्सव केवळ स्पर्धा नव्हता, तर आनंद, पुनर्वसन आणि मानवी सन्मानाचा उत्सव ठरला. खेळाच्या माध्यमातून उपचाराची संकल्पना प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संजीवीनी फाउंडेशनने आपल्या काळजी …
Read More »चलवेनहट्टीचे भाविक यल्लामा यात्रेला रवाना होणार
बेळगाव : चलवेनहट्टी येथील भाविक २५ जानेवारी रोजी सौंदत्ती येथील रेणुका देवी यात्रेसाठी रवाना होणार आहेत पुढील नियोजन प्रमाणे यात्रा साजरी करवी असे आवाहन ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे. रविवार दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी गावातून यात्रेसाठी प्रस्थान करणे तसेच जोगुळभावी येथील परड्या भरुण रेणूका देवीचा डोंगर चढणे, मंगळवार …
Read More »जय जय स्वामी समर्थ घोषात, पादुका पालखी परिक्रमेचे बेळगावात भक्तीभावात स्वागत
बेळगाव : अक्कलकोटहून निघालेल्या स्वामी समर्थांच्या पादुका पालखी परिक्रमेचे आज सोमवारी सायंकाळी येथील गोवावेस दत्त मंदिरात मोठ्या भक्तीभावात स्वागत करण्यात आले. यावेळी “जय जय स्वामी समर्थ” जयघोषाने परिसर दणाणून गेला. श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळ संस्थापक अध्यक्ष जनमेयजय राजे विजयसिंह राजे भोसले तसेच कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जनमेजय राजे भोसले …
Read More »म. ए. युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ आदर्श शाळा पुरस्कार २०२५-२६ साठी आवाहन करीत आहोत. बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून …
Read More »हर्षिता ठाकूरसह अन्य सहा जणांवर धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल
बेळगाव : बेळगाव शहरात काल एकूण आठ ठिकाणी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त शहरात सर्वत्र शोभायात्रा काढण्यात आली होती. बेळगाव शहरालगत असणाऱ्या पिरनवाडी येथे देखील हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी सुरू असलेल्या शोभायात्रे दरम्यान हर्षिता ठाकूर यांनी पिरनवाडी येथील प्रार्थना स्थळासमोर शोभायात्रा येताच अवमानकारक …
Read More »“महिला सक्षम झाली की समाजाचं भवितव्य उजळतं : अॅड. तृप्ती सडेकर पाटील
हळदी-कुंकूच्या निमित्ताने मण्णूरमध्ये महिला शक्तीचा गौरव बेळगाव : मातोश्री सौहार्द संघ, नियमित मण्णूर व आर. एम. चौगुले यांच्या सौजन्याने रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी अनन्या फार्महाऊस, मण्णूर येथे पारंपरिक हळदी-कुंकू समारंभासह आयोजित करण्यात आलेला सौभाग्य व सन्मान सोहळा अत्यंत उत्साहात व अभूतपूर्व उपस्थितीत पार पडला. मण्णूर व परिसरातील …
Read More »“मराठी सन्मान यात्रा”संदर्भात आवाहन…
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने समस्त सीमाभागात मराठी भाषेचा सन्मान व्हावा यासाठी येत्या २६ जानेवारीला स्वराज्याची राजधानी दुर्गराज रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने मराठी सन्मान यात्रेची सुरुवात करण्यात येत असून ज्यांना ह्या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी किंवा कोणत्याही प्रकारच सहकार्य किंवा सूचना द्यायचा असल्यास त्यांनी …
Read More »कर्नाटकातील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून सीमावासीयांच्या भावना पायदळी!
शिवसेना शिंदे गट कर्नाटकात संघटना विस्तारित करू पाहत असताना सीमावासीयांच्या भावना पायदळीत उडवत अक्षरशः मराठी भाषिकांच्या जखमांवर मीठ चोळत आहे. एकीकडे सीमा प्रश्नासाठी महाराष्ट्र सरकार न्यायालयात लढा देत असताना सीमाप्रश्नाबाबत शिवसेना शिंदे गटाच्या बेळगाव जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून बेजबाबदार वक्तव्य होत आहेत. जी महाराष्ट्राच्या अधिकृत भूमिकेलाच छेद देणारी ठरली आहेत. …
Read More »“स्वामी समर्थ” मालिकेतील कलाकार बुधवारी बेळगावात
बेळगाव : स्वामी समर्थ पादुका आणि पालखी परिक्रमेचे उद्या सोमवारी बेळगाव शहरात आगमन होत आहे. सदर पादुका आणि पालखी परिक्रमा ७ दिवस बेळगावात विविध ठिकाणी मुक्कामी राहणार आहे. दरम्यान याच काळात कलर्स मराठी या वाहिनीवर लोकप्रिय ठरलेल्या स्वामी समर्थ मालिकेतील कलाकारही बेळगावच्या परिक्रमेत बुधवार दिनांक 21 रोजी सहभागी होणार …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta