बेळगाव : दुष्काळ निवारणासाठी जिल्हा प्रशासनाकडे समर्पक निधी आहे. बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिक नोकर भरतीसाठी आम्ही यापूर्वीच समितीची बैठक घेतली आहे. 359 पौरकार्मिकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगावमध्ये आज प्रसारमाध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, बेळगाव जिल्ह्यातील पौरकार्मिकांच्या भरतीसाठी …
Read More »जिल्हा पालक सचिव अंजुम परवेज यांनी घेतली जिल्हा प्रगती आढावा बैठक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले असल्याने शहरी व ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, सर्वांना रोजगार आणि नरेगा योजनेंतर्गत गुरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशा कडक सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव व बेळगाव जिल्हा प्रभारी सचिव डॉ. अंजुम परवेज …
Read More »सरस्वती महिला मंडळचा पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव : अनंतशयन गल्ली येथील सरस्वती महिला मंडळाच्या पहिल्या वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष मीनाताई बेनके उपस्थित होत्या. त्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त मंडळातील सर्व महिलांनी एकत्रित येत दांडिया, गरबा, हादगा यासह अनेक विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी …
Read More »गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या कथाकथन व हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न
बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे दिनांक 18 नोव्हेंबर रोजी बालसाहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाल साहित्य संमेलनाच्या कथाकथन सत्रासाठी बालकथाकारांची निवड करण्यासाठी कथाकथन स्पर्धा व दिवंगत कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन 9 नोव्हेंबर रोजी मराठी विद्यानिकेतन येथे करण्यात आले …
Read More »बिजगर्णी येथील श्री लक्ष्मी यात्रा पुढील वर्षी 16 एप्रिल रोजी
बेळगाव : बिजगर्णी (बेळगाव) येथील श्री लक्ष्मी यात्रोत्सव 16 एप्रिल 2024 रोजी करण्यात येणार आहे. नुकताच गावातील श्री ब्रह्मलिंग देवळात ग्रामस्थ मंडळाची बैठक संपन्न झाली. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष वसंत अष्टेकर उपस्थित होते. बिजगर्णी, कावळेवाडी अशा दोन गावांची ही लक्ष्मीची यात्रा एकत्रितपणे होणार आहे. बिजगर्णी गावातील श्री ब्रह्मलिंग …
Read More »सुवर्णसौध बांधकामाचा आराखडा चुकीचा
विधान परिषद अध्यक्ष बसवराज होरट्टी यांचा गौप्यस्फोट बेळगाव : कर्नाटक सरकारने हलगा येथे बांधलेल्या सुवर्णसौधच्या बांधकामाचा आराखडा चुकीचा असल्याचा गौप्यस्फोट विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीची माहिती घेण्यासाठी बसवराज होरट्टी यांनी आज सुवर्णसौधला भेट दिली. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या …
Read More »हिवाळी अधिवेशनाच्या व्यवस्थेची पुरेपूर काळजी घ्या : विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर
बेळगाव : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेळगावच्या सुवर्णसौध येथे विधिमंडळाचे अधिवेशन होत आहे. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सहभागी होणारे मंत्री, आमदार, अधिकारी यांच्यासह सर्वांना योग्य निवास, भोजन व वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या व्यवस्थेची पुरेपूर काळजी घेण्यात यावी, अशी सूचना कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यू. टी. खादर यांनी अधिकार्यांना …
Read More »प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना पात्रता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती : महांतेश कवटगीमठ
बेळगाव : पीयूसी प्रथम वर्षातील हुशार विद्यार्थ्यांना पात्रता चाचणीद्वारे शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय केएलई संस्थेने घेतला आहे अशी माहिती केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ यांनी दिली.बेळगावात मंगळवारी केएलई संस्थेच्या आरएलएस कॉलेजच्या सभागृहात पत्रकार परिषदेला संबोधित करताना केएलई संस्थेचे संचालक महांतेश कवटगीमठ म्हणाले की, 1916 मध्ये स्थापन झालेल्या केएलई संस्थेने आज …
Read More »…म्हणे सुवर्णसौधमुळे सीमालढा संपुष्टात : विधान परिषद अध्यक्षांचा अजब तर्क
बेळगाव : बेळगाव सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा, यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती सातत्याने लढा देत आहे. बेळगाव येथे सुवर्ण विधानसभा बांधण्यात आले. त्यानंतर प्रत्येक वर्षी विधिमंडळाचे अधिवेशन बेळगावच्या सुवर्णसौध येथे आयोजित केले जात आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमा लढ्याचे अस्तित्वच संपुष्टात आले आहे, असा अजब तर्क कर्नाटक विधान …
Read More »अतिक्रमित जागेवरील बांधकाम हटवा; बिजगर्णी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बिजगर्णी येथील सरकारी जागेवर अतिक्रमण करून घर बांधले आहे. उद्देशपूर्वक जागेवर अतिक्रमण केले असून सदर अतिक्रमण हटवून संबंधितावर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बिजगर्णी ग्रा. पं. व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकऱ्यांना देण्यात आले. बिजगर्णी येथील सर्व्हे क्र. १९६ मध्ये सरकारी जमिनीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. बिजगर्णी ग्राम सभेमध्ये ग्रा. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta