Thursday , December 5 2024
Breaking News

बेळगाव

विकेंड लॉकडाऊन काळात बँका बंद; एटीएम सुरू

बेळगाव : बेळगाव जिल्हाधिकऱ्यांनी तीन दिवस कडक लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवारी सकाळी 6 पर्यंत लॉकडाऊन राहणार आहे. या काळात बँका बंद राहतील मात्र एटीएम सुरू राहणार आहेत, असे लीड बँकेचे व्यवस्थापकांनी सांगितले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे विकेंड लॉकडाऊनच्या कालमर्यादेत वाढ करण्यात आली आहे. …

Read More »

कर्नाटकात आणखी ४ ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल

बंगळूर : कर्नाटकात ऑक्सिजनची कमतरता असल्याचे राज्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी केंद्र आणि कर्नाटक हायकोर्टाला पत्र पाठवून राज्याला मिळणार ऑक्सिजनचा वाटा पुरवण्यासंदर्भात मागणी केली होती. दरम्यान, आज कर्नाटकात ४ ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाल्या. या ४ ट्रेनच्या माध्यमातून ४३७ मेट्रिक टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन कर्नाटकात आला आहे. …

Read More »

कर्नाटक : मुख्यमंत्र्यांनी दिले लॉकडाऊन वाढीचे संकेत

बेंगळूर : राज्यात लॉकडाऊन वाढीबाबत चर्चा सुरु असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी निर्यात व्यवसायांना परवानगी दिली जाईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला नसल्याने योग्य निर्णय घेतला जाईल असे ते म्हणाले. राज्यात सध्या ७ जूनपर्यंत …

Read More »

मनपा कर्मचाऱ्यांची लाॅकडाऊनसंदर्भात जनजागृती

बेळगाव : कोरोना प्रादुर्भावाला थोपविण्यासाठी सरकारने येत्या शुक्रवारपासून लागू केलेल्या सलग तीन दिवसांच्या कडक लाॅकडाऊनसंदर्भात मनपा आयुक्तांच्या आदेशावरून आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी प्रभाग क्र. 20 आणि 21 मध्ये जनजागृती मोहीम राबविली.महापालिकेच्या आरोग्य निरीक्षक शिल्पा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वच्छता निरीक्षक संजय पाटील व नितिन देमट्टी यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या मार्शल्सनी येत्या दि. …

Read More »

प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणावर नियुक्ती

बेळगाव (प्रतिनिधी) : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख आणि कला शाखेचे डीएन प्रा. डॉ. विनोद गायकवाड यांची नियुक्ती कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरणवर सदस्य म्हणून कर्नाटक सरकारने नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती तीन वर्षांसाठी आहे.सर्वसामान्य जनतेच्या भल्यासाठी कायदा सेवा प्राधिकरण कार्यरत आहे या मंडळावर समाजातील विविध स्तरातून समाजशील …

Read More »

सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करा : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : बेळगावातील कोविड इस्पितळाच्या समस्यांबाबत जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी बुधवारी खासगी इस्पितळ संघटनेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधींची बैठक घेतली. सरकारच्या मार्गसूचीचे पालन करत कोविड महामारीचा समर्थपणे सामना करण्यात योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. बेळगावातील कोविड रुग्णांना दिले जाणारे उपचार, इस्पितळांतील सुविधा, उपचारांसाठी आकारले जाणारे शुल्क व अन्य विषयांवर चर्चा करून …

Read More »

दांडेलीत नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; ६ जणांना अटक

दांडेली : उत्तर कन्नड जिल्ह्यातील दांडेली ग्रामीण पोलिसांनी मोठी मोहीम राबवून नकली नोटा चलनात आणणाऱ्या रॉकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी ६ जणांना अटक करून लाखो रुपये मूल्याच्या नोटांचा मोठा साठा जप्त केला आहे. दांडेलीतील डीडीएल वनश्री भागातील शिवाजी कांबळे नामक एकाच्या घरातून या नकली नोटा जप्त करण्यात आल्या. ४.५ लाख …

Read More »

बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर

बेळगाव : बेळगावातील बिम्स इस्पितळाला उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी नुकतीच भेट देऊन तेथील गैरकारभाराबाबत ताशेरे ओढले होते. त्यानंतर मुख्यमंत्री येडियुराप्पा बिम्सला लवकरच भेट देणार असल्याचे नियोजन आहे. मात्र या पार्श्वभूमीवर बिम्स संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प अचानक दीर्घ रजेवर गेल्याने उलट–सुलट चर्चेला ऊत आला आहे. कोविड रुग्णांसह अन्य रुग्णांनाही बिम्समध्ये व्यवस्थित …

Read More »

‘बिम्स’ला येणारे सर्व रस्ते अचानक बंद; नागरिकांना मनस्ताप

बेळगाव : बेळगावात चन्नम्मा सर्कल, बिम्स इस्पितळाकडे येणारे डॉ. आंबेडकर रोडसह सर्व रस्ते बुधवारी सकाळी पोलिसांनी अचानक बंद केले. त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना इच्छित स्थळी पोहोचताना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. ऍम्ब्युलन्स चालकांनाही यामुळे बिम्सकडे जाताना अडथळ्यांची शर्यत पार पाडावी लागली. बेळगावातील चन्नम्मा चौक ते के एल ई …

Read More »

जिल्ह्यात ब्लॅक फंगसचे ८७ रुग्ण; मुलांत लक्षणे नाहीत : जिल्हाधिकारी हिरेमठ

बेळगाव : जिल्ह्यात २ दिवसांत ब्लॅक फंगसचे १७ नवे रुग्ण आढळून आले होते. आजवर त्यांची एकूण संख्या ८७ झाली आहे. मात्र जिल्ह्यातील एकाही मुलामध्ये अद्याप ब्लॅक फंगसची लक्षणे आढळून आलेली नाहीत असे जिल्हाधिकारी महांतेश हिरेमठ यांनी मंगळवारी स्पष्ट केले. बेळगावात मंगळवारी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना जिल्हाधिकारी हिरेमठ यांनी सांगितले की, …

Read More »