Monday , September 21 2026
Breaking News

बेळगाव

शेतकऱ्यांसाठी रयत भवन उपलब्ध करून द्या; राष्ट्रीय रयत संघाची मागणी

  बेळगाव : मध्यवर्ती बसस्थानकासमोरील रयत भवन शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघ बेळगाव शाखेने केली आहे. शेतकरी नेत्यांनी किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयासमोर गुरुवारी (ता. २३) धरणे धरुन आपल्या मागणीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. सार्वजनिक बांधकाम खात्याने मध्यवर्ती बसस्थानकासमोरील इमारतीमध्ये शेतकऱ्यांना रयत भवनासाठी म्हणून जागा उपलब्ध …

Read More »

विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

  बेळगाव : विविध मागण्यांसाठी गुरुवारी (ता. २३) बेळगाव जिल्हा पदवीपूर्व महाविद्यालय कर्मचारी महामंडळ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राचार्य संघ, पदवीपूर्व महाविद्यालय प्राध्यापक संघ, पदवीपूर्व महाविद्यालय क्रीडाशिक्षक संघ आणि पदवीपूर्व महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. सदर मागण्यांची पूर्तता न …

Read More »

बेळगुंदीतील बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह विहिरीत सापडला

  बेळगाव : बेळगुंदी येथील मंगळवारपासून बेपत्ता असलेल्या गिल्बर्ट डायस (56) यांचा मृत्यदेह विहिरीत तरंगताना आज शेतकर्‍यांच्या निदर्शनास आला. याबाबतची माहिती पोलिसाना देण्यात आली. गावाजवळील शेतातील विहिरीत मृत्यदेह सापडल्याने त्यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास मृतदेह बाहेर काढला. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने बुधवारी वडगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात …

Read More »

रमेश जारकीहोळी यांनी घेतली विजयेंद्र यांची भेट

  बेंगलोर : बी. एस. येडियुरप्पा यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांची कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे पाहायला मिळत होते. विजयेंद्र यांच्या प्रदेशाध्यक्षपद निवडीवरून बसवराज पाटील यतनाळ आणि रमेश जारकीहोळी नाराज असल्याची जोरदार चर्चा होती. या पार्श्वभूमीवर आज गुरुवारी रमेश जारकीहोळी यांनी विजयेंद्र …

Read More »

महालक्ष्मी सोसायटीच्या नुतन इमारतीचे बेळवट्टीत उद्घाटन

  बेळगाव : बेळवट्टी-बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री महालक्ष्मी मल्टीपर्पज सोसायटीतर्फे बांधण्यात आलेल्या नूतन कार्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई अध्यक्षस्थानी होते. निवृत्त शिक्षक वाय. पी. नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संचालक आर. बी. देसाई यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर बी. …

Read More »

महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार; नियोजनासाठी 11 सदस्यांची नियुक्ती

  बेळगाव : कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या निषेधार्थ 4 डिसेंबर रोजी मराठी भाषिकांचा महामेळावा यशस्वी करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. महामेळाव्यासंदर्भात आज बुधवारी दुपारी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्त्वपूर्ण बैठक मराठा मंदिर येथे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मराठी भाषिकांचा हा मेळावा …

Read More »

मच्छे येथील खून प्रकरणातील संशयिताला जामीन

  बेळगाव : मच्छे येथे घडलेल्या खून प्रकरणातील संशयिताला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. महेंद्र राजू तळवार (वय १९ रा. गंगा गल्ली, मच्छे) असे जामीन मिळालेल्या संशयिताचे नाव आहे. मयत प्रतीक एकनाथ लोहार (रा. अनगोळ) आणि या खून प्रकरणातील मुख्य आरोपी प्रवीण उर्फ छोट्या बाबू बळगण्णावर यांच्यामध्ये क्रिकेटवरून वाद झाला. …

Read More »

बेळगावातील प्रसिध्द चित्रकाराला फसविणारा अटकेत

  बेळगाव : पर्यटन मंत्रालयाचा महासंचालक असल्याची बतावणी करून कोट्यवधी रुपयांचा गंडा घातलेल्या तोतया अधिकारी अनिरुध्द होशिंग याला नागपूर पोलिसांनी लखनौ येथून अटक केली असून प्रसिध्द चित्रकार विकास पाटणेकर यांना अयोध्या येथील श्री राम मंदिराचे चित्रांचे काम देतो म्हणून फसवणूक केली आहे. यवतमाळ आणि नागपूर येथील अनेक उद्योजकांना आपण पर्यटन …

Read More »

वंदे भारत एक्स्प्रेस बेळगावात अवतरली!

  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील लाखो लोकांचे स्वप्न अखेर साकार झाले. बेळगाव रेल्वे स्थानकावर मंगळवारी बहुप्रतीक्षित वंदे भारत एक्स्प्रेस दाखल झाली आणि मोठ्या संख्येने जमलेल्या बेळगावकरांनी एकच जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील वंदे भारत एक्स्प्रेसने देशभरात चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. बेळगावलाही ही एक्स्प्रेस यावी अशी अनेकांची इच्छा होती. …

Read More »

वर्दीची रिक्षा पलटी तीन विद्यार्थी जखमी

  बेळगाव : शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ऑटो रिक्षा पलटी झाल्याने तीन विद्यार्थी जखमी झाल्याची घटना मच्छे येथे घडली आहे. बेळगाव खानापूर रोडवर दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास हा अपघात घडला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, पिरनवाडी येथील इंग्लिश मिडीयम शाळेतून मच्छेकडे विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या रिक्षाला अपघात झाला …

Read More »