बेळगाव : कार झाडावर आदळल्याने कारमधील दोन जण जागीच ठार झाले आणि एक प्रवासी गंभीर जखमी झाला. सदर अपघात बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील बेळगाव-बागलकोट मुख्य रस्त्यावरील सोमनट्टी गावाजवळ घडला. यरगट्टीहून बेळगावकडे जात असताना सोमनट्टी गावाजवळ स्विफ्ट डिझायर कारचे नियंत्रण सुटले आणि कार थेट झाडावर आदळली. बेळगाव तालुक्यातील करिकट्टी गावातील …
Read More »बिजगर्णी हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित बिजगर्णी हायस्कूलमधील शिकणाऱ्या गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना मोफत सायकली वाटप व रक्षाबंधन असा संयुक्तिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष एस. एम. जाधव उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थिनींनी स्वागतगीत सादर केले. दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक …
Read More »संजीवीनी फौंडेशनमध्ये रक्षाबंधन सण उत्साहात साजरा
बेळगाव : रक्षाबंधन म्हणजे एक पवित्र सण, तो फक्त एकाच आईच्या उदरातुन जन्म घेतलेल्या बहीण भावाचा सण नसून समाजात वावरत असताना भेटलेल्या प्रत्येक स्त्री पुरुषाने साजरा करायचा सण असल्याचे मत अंध विद्यार्थ्यांसाठी कार्य करणाऱ्या समृद्ध फौंडेशनचे सचिव प्रशांत पोतदार यांनी व्यक्त केले. संजीवीनी फौंडेशन आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत …
Read More »अपघातात जखमी पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू
बेळगाव : अथणी तालुक्यातील चमकेरी गावातील हनुमंत पडोळकर, जे एका भीषण रस्ता अपघातात गंभीर जखमी झाले होते आणि रुग्णालयात उपचार घेत होते, त्यांचे निधन झाले आहे. ते बेंगळुरूमधील डीएआरमध्ये कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. बंगळुरूमधील एका खाजगी …
Read More »खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतली कन्नडसक्तीसंदर्भातील माहिती!
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सुरु असलेल्या कन्नडसक्तीसंदर्भातील परिस्थितीची संपूर्ण माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी जाणून घेतली. आज दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी ठाणे मुक्कामी आनंदवन आश्रमात रक्षाबंधनाच्या कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समितीचे वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर यांनी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन बेळगावसह सीमाभागातील मराठी …
Read More »सीमाप्रश्नी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तज्ञ कमिटी अध्यक्ष धैर्यशील माने यांचे पत्र!
बेळगाव : कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नासंदर्भात दोन्ही राज्यांच्या सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची संयुक्तिक बैठक बोलवण्यात यावी अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना तज्ञ कमिटी अध्यक्ष खासदार धैर्यशील माने यांनी पत्राद्वारे केली आहे. सीमाभागात सध्या सुरू असलेल्या कन्नडसक्तीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने …
Read More »माधुरी हत्तीसाठी शेडबाळ येथे ‘गावबंद” आंदोलन!
बेळगाव : कर्नाटक राज्यातील शेडबाळ येथेही आज नांदणी मठातील माधुरी हत्ती परत मठात घेऊन यावा या मागणीसाठी गाव बंद करून आंदोलन करण्यात आले. वनतारामधून माधुरी हत्तीला नांदणी मठात परत घेऊन यावे या मागणीसाठी शेडबाळ गावातील संपूर्ण व्यवहार बंद करून भव्य मोर्चा काढण्यात आला. शांतीसागर जैन आश्रमापासून श्री बसवाण्णा मंदिरापर्यंत …
Read More »मराठी भाषिकांनी पक्षभेद विसरून मोर्चात सहभागी व्हा : युवा समितीचे आवाहन
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची व्यापक बैठक शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी युवा समिती कार्यालयात अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेकायदा कन्नडसक्ती विरोधात आणि मराठी भाषिकांना संविधानाने दिलेले भाषिक अधिकार मिळाले पाहिजे यासाठी सोमवार दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वाजता धर्मवीर …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग यांच्यावतीने पिरनवाडी, मच्छे भागात जनजागृती
बेळगाव : युवा समिती सीमाभाग यांच्या वतीने मोर्चात मराठी भाषिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, मोर्चा यशस्वी करावा यासाठी पिरनवाडी, मच्छे भागात जनजागृती केली. आणि कन्नडसक्तीचा विरोधातील मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि मोर्चा यशस्वी करावा असे आवाहन केले. यावेळी पिरनवाडी, मच्छे ग्रामस्थांनी जाहीर पाठिंबा व्यक्त केला. यावेळी पिरनवाडी येथील …
Read More »….म्हणे फक्त निवेदन द्या, मोर्चा काढू नका; बेळगाव पोलिसांची समितीच्या नेते मंडळींना नोटीस
बेळगाव – कन्नड सक्तीच्या विरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने सोमवार दिनांक 11 रोजी महामोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चासाठी शहर, उपनगर, बेळगाव तालुका तसेच खानापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. सोमवारच्या मोर्चाला मोठ्या संख्येने मराठी भाषिक उपस्थित राहणार अशीच दाट शक्यता आहे. दरम्यान पोलीस प्रशासनाने आज महाराष्ट्र …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta