मच्छे : येथील सरकारी मॉडेल प्राथमिक मराठी केंद्र शाळा, मच्छे येथील विद्यमान व माजी एसडीएमसी सदस्यांनी आपल्या गावातील व्ही. एस. पाटील हायस्कूल, मच्छे यांना यावर्षीच्या दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के निकाल लागल्याबद्दल सदिच्छा भेट देऊन शिक्षकवृंदांचे अभिनंदन केले. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमात शाळेच्या शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात …
Read More »मराठी अर्ज नसल्याने निवडणूक कर्मचाऱ्यांना धाडले माघारी
बेळगाव : बेळगावसह सीमाभागात सध्या निवडणूक विभागाकडून मतदार यादी फेरनिरीक्षण (SIR – Special Intensive Revision) प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत घरोघरी जाऊन मतदारांना अर्ज दिले जात आहेत. मात्र, प्रशासनाकडून हे अर्ज केवळ ‘कन्नड’ भाषेतच उपलब्ध करून दिले जात असल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. भाषिक अधिकारांची …
Read More »ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थिनीची राष्ट्रीय स्तरावरील स्पेल बी परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती सेंट्रल स्कूल, बेळगाव येथील इयत्ता पाचवी ‘ब’ मधील विद्यार्थिनी अन्शाराह शोएब मुल्ला हिने आपल्या उत्कृष्ट शब्दलेखन कौशल्य, इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व मेहनतीच्या जोरावर WIZ International Spell Bee या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. …
Read More »अनगोळनंतर काँग्रेस रोडवरील अतिक्रमणांवरही बुलडोझर; रात्री उशिरापर्यंत मोहीम
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने अनगोळ परिसरानंतर काँग्रेस रोड आणि परिसरातील अवैध अतिक्रमणांवरही मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कारवाई करत रस्ते व पदपथ मोकळे केले. पोलीस बंदोबस्तात शांततेत पार पडलेल्या या मोहिमेत स्टॉल, पत्र्याचे शेड तसेच काही अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. महानगरपालिकेने यापूर्वी अनगोळ नाका ते मराठी शाळा या …
Read More »जिल्हास्तरीय कबड्डी शांतिनिकेतन, संत मीरा देवेंद्र जीनगौडा शाळेचा अंतिम फेरीत प्रवेश
बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा अनगोळ, देवेंद्र जिंनगौडा, शिंदोळी या शाळेने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला.तसेच कराटे, बुद्धिबळ स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. शाळेच्या माधव सभागृहात या स्पर्धेच्या उद्घाटनाला …
Read More »मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी
बेळगाव : दिनांक 27 जून रोजी मराठी विद्यानिकेतनमध्ये राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून शाळेतील शिक्षिका संज्योत बांदेकर उपस्थित होत्या. त्यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर त्यांनी शाहू महाराजांचे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य याचा थोडक्यात आढावा श्रुतिका गुरव हिने घेतला. …
Read More »आश्वासनाची आठवण; मराठी परिपत्रके, फलकांसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीची जिल्हाधिकाऱ्यांकडे पुन्हा धाव
बेळगाव : मराठी परिपत्रके आणि शासकीय कार्यालयांवरील मराठी फलकांच्या अंमलबजावणीबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, तसेच आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीची माहिती द्यावी, या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पुन्हा भेट घेत निवेदन सादर केले. समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना २२ जून रोजी …
Read More »श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात सकल मराठा समाजातर्फे गाऱ्हाणे; समाज, शेतकरी आणि पावसासाठी सामूहिक प्रार्थना
बेळगाव : सर्व समाजबांधव, बळीराजा, शेती आणि राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार, २९ जून रोजी दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिरात पारंपरिक गाऱ्हाणे घालण्याचा धार्मिक कार्यक्रम भक्तीभावाने पार पडला. या प्रसंगी देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण पाटील यांनी समस्त मराठा समाज आणि शेतकरी …
Read More »दड्डी भागातील बेंदूर सण उत्साहात साजरा; बैलांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त
दड्डी : हुक्केरी तालुक्यातील दड्डी परिसरात पारंपरिक बेंदूर सण मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कोट गावासह परिसरातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बैलांची विधिवत पूजा करून कृषी संस्कृतीचे जतन केले. यावेळी शेतकऱ्यांनी बैलांना आंघोळ घालून त्यांना रंगीबेरंगी झुली, माळा, फुलांचे हार व आकर्षक सजावटीने सजवले. बैलांच्या शिंगांना रंग …
Read More »लेबर कार्डही आता आधारशी जोडणार; बनावट नोंदणीला लगाम, अपात्र लाभार्थ्यांची होणार छाननी
बेळगाव : शासकीय योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभ केवळ पात्र लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचावा यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध योजनांना आधार कार्डची जोडणी अनिवार्य केली जात आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणून आता बांधकाम कामगारांचे लेबर कार्ड (कामगार कार्ड) आधार कार्डशी लिंक करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, बेळगाव जिल्ह्यातही या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta