देसूर : मा. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली देसूर काँग्रेस कमिटीच्या वतीने मतदार यादी अद्ययावत करण्यासंदर्भात बीएलओ (BLO) बाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नवीन मतदार नोंदणी प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी बूथ पातळीवर …
Read More »रामदेव हॉटेलजवळ धावत्या कारला अचानक आग; काही क्षणांतच कार जळून खाक
बेळगाव : शहरातील रामदेव हॉटेल समोरील डी-मार्ट कॉर्नरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी धावत्या स्विफ्ट कारला अचानक आग लागून काही क्षणांतच संपूर्ण वाहन जळून खाक झाले. मिळालेल्या माहितीनुसार, कार चालू असतानाच इंजिन भागातून अचानक धूर येऊ लागला आणि त्यानंतर काही क्षणांतच आगीने तीव्र रूप धारण केले. परिस्थिती लक्षात येताच चालक व …
Read More »बेळगाव येथील वक्तृत्व स्पर्धेत मच्छेच्या माजी विद्यार्थ्याची चमक; पुष्कर कोलेकर याला द्वितीय क्रमांक
बेळगाव : छत्रपती शाहू प्रकाशन मंडळ, बेळगाव व राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत मच्छे येथील माजी विद्यार्थी कु. पुष्कर परशराम कोलेकर याने द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे. पुष्कर हा सरकारी मॉडेल प्राथमिक …
Read More »वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला बाजारपेठ फुलली; पूजा साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी
बेळगाव : सोमवारी (दि. २९) साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरातील बाजारपेठांमध्ये महिलांची मोठी लगबग पाहायला मिळाली. रविवारची सुटी असल्याने सकाळपासूनच पूजासाहित्य, फुले, फळे आणि वाण खरेदीसाठी महिलांनी बाजारपेठेत मोठी गर्दी केली होती. वटपौर्णिमा हा सुवासिनींसाठी महत्त्वाचा सण मानला जातो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करून उपवास करण्याची परंपरा असल्याने …
Read More »कॅम्प पोलीस ठाण्याचे नव्या इमारतीत स्थलांतर; उद्यापासून बीएसएनएल इमारतीतून सेवा
बेळगाव : शहरातील कॅम्प पोलीस ठाण्याचे सोमवार, दि. २९ जून २०२६ पासून नव्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. हाय स्ट्रीटवरील बी.सी. क्र. ९७ येथील जुन्या इमारतीची संरचनात्मक सुरक्षितता धोक्यात आल्याने हे पोलीस ठाणे आता ग्लोब चित्रपटगृहासमोरील बीएसएनएल इमारतीत कार्यरत राहणार आहे. पोलीस आयुक्तालयाने जारी केलेल्या सूचनेनुसार, नागरिकांनी यापुढे कॅम्प …
Read More »विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे : अजय कांडर
बेळगाव : “जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा संपली की संस्कृतीही नष्ट होते. भाषा जिवंत ठेवण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. त्यामुळे कवितेतून वैश्विक विचार व्यक्त होणे आवश्यक असून विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी अजय कांडर यांनी केले. शब्दगंध कविमंडळ, बेळगाव यांच्या वतीने …
Read More »मतदार फेरनिरीक्षण प्रक्रियेसाठी मराठीत अर्ज उपलब्ध करून द्यावेत : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष श्री अंकुश केसरकर यांनी, कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून विशेष मतदार यादी फेरनिरीक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेसाठी मराठी भाषेतील अर्ज (Enumeration) तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. तसेच मराठी अर्ज उपलब्ध होईपर्यंत संबंधित विधानसभा मतदारसंघांमधील फेरनिरीक्षण प्रक्रिया स्थगित …
Read More »सीमावासियांवरील अन्याय व सीमाप्रश्नी खा. उदयनराजे लिहिणार गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतली खा.उदयनराजे भोसले व आम. शिवेंद्रराजे भोसले यांची भेट बेळगाव : गेल्या सत्तरवर्षांपासून प्रलंबित असलेला सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी माणसावर होणारे भाषिक अत्याचार, लोकशाही मार्गाने न्याय मागताना जाणूनबुजून मराठी माणसावर दाखल होणारे गुन्हे, मराठी भाषेची गळचेपी व कन्नडसक्तीचे अतिक्रमण या अनुषंगाने खानापूर …
Read More »येळ्ळूर म. ए. समितीचा अवजड वाहतुकी विरोधात रस्ता रोको
वडगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक लक्काप्पा जोडट्टी यांना दिले निवेदन; रस्ते कॉन्ट्रॅक्टरला बोलावून दिली समज येळ्ळूर : हालगा–मच्छे बायपास रोडच्या कामामुळे येळ्ळूर गावातून सुरू असलेली डंपर वाहतूक तात्काळ पर्यायी मार्गाने वळविण्या बरोबरच येळ्ळूर मार्गे होणारी वाळू, विटा व माती यांची वाहतूक बंद करावी, तसेच येळ्ळूर रस्त्याची डागडुजी करण्यासंदर्भात रविवारी सकाळी …
Read More »येळ्ळूर येथे पल्स पोलिओ कार्यक्रमाचे उद्घाटन
येळ्ळूर : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत आज रविवारी सकाळी श्री चांगळेश्वरी मंदिर, येळ्ळूर येथील बुथ मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येळ्ळूर यांच्यावतीने पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाचा उद्घाटन समारंभ उत्साहात पार पडला. श्री चांगळेश्वरी मंदिर येथे सकाळी 8:30 वा. आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी ग्राम पंचायत अध्यक्ष …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta