राजू पोवार : शेंडूरमध्ये रयत संघटना शाखेचे उद्घाटन
निपाणी (वार्ता) : रासाई शेंडूर परिसरातील शेतकरी बांधवांचा रयत संघटनेत काम करण्याचा निर्धार झाला आहे. आजपर्यंत सर्वच पक्षांनी केवळ निवडणुकीपुरता शेतकर्यांचा वापर करून घेतला आहे. निवडणुकीनंतर मात्र शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे विकास कामामध्ये हा परिसर मागासलेला आहे. शेतकरी बांधवांच्या समस्या रयत संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी रयत संघटनेचे शाखा उद्घाटन करण्यात आले आहे. रयत संघटना नेहमीच शेंडूरवासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. इथून पुढे कुणावरही अन्याय होवू देणार नाही, असे मत चिकोडी जिल्हा अध्यक्ष राजू पोवार यांनी व्यक्त केले. शेंडूर येथे आयोजित शाखेचे उद्घाटन करून ते बोलत होते.
काहीशा दुर्लक्षित व डोंगराळ भागातील शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटनेचे सरसावली आहे. त्यामुळे शेंडूर पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांच्या आशा पल्लवित झाल्या असल्याचे पांडुरंग तोडकर यांनी सांगितले.
यावेळी ग्रामीण युवा अध्यक्ष बाळासाहेब हादिकर, निपाणी शहर अध्यक्ष उमेश भारमल, शहर उपाध्यक्ष सर्जेराव हेगडे, शहर सेक्रेटरी भगवंत गायकवाड, आडी शाखा अध्यक्ष बाबासाहेब पाटील, शाखा सेक्रेटरी तानाजी पाटील, शिवापूरवाडी शाखा अध्यक्ष संजय जोमा, जैनवाडी शाखा अध्यक्ष नामदेव साळुंखे, बुदिहाळचे बाळासाहेब पाटील, श्रीकांत संकपाळ, शेंडूर येथील पांडुरंग तोडकर, शंकर पाटील, बाळासाहेब कांबळे, संजय कांबळे, रजपूत त्यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
Check Also
पुर्वीप्रमाणे पाणी बील आकारणीचा पहिला ठराव मंजूर करावा
Spread the love निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिकेच्या नुतन पदाधिकाऱ्यांची पहिली सर्व साधारण सभा मंगळवारी …