कोगनोळी : येथील माळी गल्लीतील रहिवाशी उदय नसगोंडा उर्फ कल्लाप्पा चौगुले (वय 52) यांचे स्वतःचे विहिरीमध्ये शेतात काम करत असताना पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार तारीख 22 रोजी दुपारी उघडकीस आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हणबरवाडी रोडवर चौगुले मळा म्हणून परिचित असणाऱ्या शेतीवाडीतील त्यांच्या स्वतःच्या विहिरी जवळून शेतातील पाणी पाजण्याची पाहणी करण्यासाठी ते गेले होते. यावेळी त्यांचा पाय घसरला. त्यांना पोहता येत नसल्यामुळे पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला. घटना दुपारी दोनच्या सुमारास उघडकीस आली. उदय चौगुले नेहमीप्रमाणे सकाळी स्वतःच्या शेतीकडे गेलेले होते. बराच वेळ घरी न आल्यामुळे त्यांचा मुलगा तुषार चौगुले यांनी सर्वत्र शोधाशोध केली. विहिरीमध्ये सदरचा मृतदेह तरंगत असल्याचे दिसून आले.
घटना समजताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे एएसआय एस ए टोलगी, हवलदार संदीप गाड्डीवडर, गजानन हवलदार, गौस हवलदार, यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृत्यदेह शवविच्छेदनासाठी महात्मा गांधी हॉस्पिटल निपाणी येथे पाठवण्यात आला.
उदय चौगुले यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे. घटनास्थळी व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
पोहता आले पाहिजे ,बाबा
ज्यांना पाण्याच्या संबंधित कामे करावी लागतात त्यांनी तर आवर्जुन पोहता शिकार 🙏।