Sunday , June 28 2026
Breaking News

निपाणी परिसरात विद्यार्थ्यांनी अनुभवला शून्य सावली दिवस

Spread the love

 

आकाश निरभ्र असल्यामुळे निरीक्षण संधी

निपाणी (वार्ता) : तू जहाँ जहाँ चलेगा, मेरा साया साथ होगा… हे गीत सर्वांच्याच आवडीचे. कुणी सोबत करो अथवा न करो, परंतु सावली आयुष्याच्या शेवट पर्यंत मनुष्याची सोबत करत असते. मात्र कधी कधी हीच विश्वसनीय सावली आपली साथ सोडते. अंधार असल्या शिवाय सावली आपली साथ सोडत नाही, असे म्हणतात. पण आता मंगळवारी तो क्षण आलाच. दुपारी १२.२९ ची वेळ झाली आणि काही क्षणापूरती आपली सावली दिसेनाशी झाली. विशेष म्हणजे हा अनुभव केवळ कुरली, निपाणी परिसरातील नागरिकांना घेता आला. खगोलशास्त्राची ही अलौकिक घटना घडण्यासाठी केवळ या परिसरातील स्थिती अनुकूल होती.
सूर्य डोक्यावर येतो किंवा आला असे आपण म्हणतो पण प्रत्यक्षात दोन दिवस वगळता सूर्य कधीच आपल्या डोक्यावर येत नाही, थोडा ना थोडा तो तिरपा झाला. तो प्रत्यक्ष डोक्यावर येण्याचे यावर्षीचे दोन दिवस ५ मे आणि ७ मे लगा आहे. कुरली येथील सिद्धेश्वर विद्यालयातील विज्ञान शिक्षक व मुख्याध्यापक एस. एस. चौगुले यांनी झिरो शॅडो डे चे शास्त्रीय कारण समजावून सांगितले. आकाशातून सूर्याचे भ्रमण उत्तरेकडून दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडून उत्तरेकडे होत असते ज्याला उत्तरायण व दक्षिणायन म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरताना साडेतेवीस अशाचा कोन करीत असते. ज्या दिवशी, ज्या वेळी हा कोन होतो. त्या वेळी शून्य सावली दिवस येतो. मजेशीर बाब म्हणजे हा सर्वत्र सारखा नसतो तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात असतो. विद्यालयातील सर सी व्ही रामन विपनेट क्लब, विज्ञान भारती क्लब तर्फे झिरो शॅडो डे निमित्त विद्यालयात वर्तुळकार उभे राहून आपल्या पायाजवळ निर्माण होणारी शून्य सावली, काचेवर विविध वस्तूंची मांडणी करून १२.२९ वाजता त्यांची सावली कशी लंब झाली त्याचे विद्यार्थ्यांना निरीक्षण करता आले. परिसरातील खांब व त्यांची सावली शून्य होईपर्यंत वेळेसह नोंदणी करीत विद्यार्थ्यांनी शून्य सावली निर्मितीचा अनुभव घेतला.
कुरलीचे अक्षांश एन १६.७४ अंश आहे. सूर्याचा डिक्लीणेशन पॉईंट उत्तरायण किंवा दक्षिणायन करताना १६.७३ अंश असतो तेव्हा कुरलीत सूर्य डोक्यावर येतो. म्हणजेच दुपारी १२.२९ वाजता सूर्याचा डिक्लीणनेशन पॉईंट १६.७४ अंश असल्याने शून्य सावली दिवस अनुभवता आला. यावेळी आर. आर. गायकवाड, विजय वैराट, अजित कांबळे, सुयश चौगुले, सागर कुंभार, स्वप्नील प्रताप, सार्थक वैराट यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *