Sunday , June 28 2026
Breaking News

‘रवळनाथ’च्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ झाल्याने समाधान

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून संस्थेच्या कायम सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यात १० टक्के वाढ करण्याचा महत्वपुर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. १ एप्रिल २०२६ पासून ही वाढ लागू करण्यात आल्या माहिती रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष व संचालक एम. एल. चौगुले व अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर यांनी दिली.
एम. एल. चौगुले म्हणाले, सभासदांचा दृढ़ विश्वास, कर्मचाऱ्यांचे सातत्यपुर्ण सहकार्य आणि त्यांच्या परिश्रमाच्या जोरावर संस्थेने प्रगतीचा वेग कायम ठेवला आहे. संस्थेच्या व्यावसायिक यशामध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. २०२५-२६ या आर्थिक सालात ३ कोटी १० लाखांचा निव्वळ नफा झाला असून या उल्लेखनीय कामगिरीच्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी महागाई भत्यात वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होणार असून, कर्मचारी वर्गातून समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राचार्य डॉ. आर. एस. निळपणकर म्हणाले, संस्थेमध्ये एप्रिल २०१४ पासून कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार वेतन दिले जाते. तसेच प्रोव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, पेन्शन, मेडीक्लेम, पगारी रजा, बोनस यासह विविध सुविधा दिल्या जातात. संस्थेच्या वृद्धीसाठी व कर्मचाऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी कर्मचारी प्रशिक्षण शिबीरे घेण्यात येतात. प्रशिक्षित कुशल कर्मचारी वर्ग हे रवळनाथचे वैशिष्ठ्य ठरत आहे.
यावेळी उपाध्यक्ष डॉ. संजय चौगुले यांच्यासह संचालक, सीईओ डी. के. मायदेव उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये ‘अग्नि सुरक्षा’ प्रात्यक्षिकासह विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

Spread the love    निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित निपाणी येथील मॉडर्न इंग्लिश …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *