Wednesday , August 26 2026
Breaking News

उन्हाच्या झळांतही हिरवाईची जपणूक बोरगावच्या शाळेतील मुख्याध्यापकांचा उपक्रम

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बोरगांव येथील पी.एम. श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळा केवळ शिक्षणासाठीच नव्हे तर पर्यावरण जपणुकीच्या सुंदर संदेशासाठीही ओळखली जात आहे. या परिवर्तनामागे उभे आहेत शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एम. पकाले यांचा उपक्रम कारणीभूत आहे.

ऐन उन्हाच्या तडाख्यात, जमिनीला भेगा पडत असताना झाडांची पाने कोमेजून जात आहेत. अशा परिस्थितीत शाळेच्या परिसरात आशेचा ओलावा बनून दररोज परिसरातील झाडांना पाईपलाईन द्वारे पाणी मिळावे, यासाठी त्यांनी स्वतः उभे राहून पाईपलाईन द्वारे झाडांना पाणी देत आहेत. त्यांच्या या अनोख्या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.
सुट्टीचा काळ म्हणजे विश्रांतीचा असून कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवले जाते. पण पकाले यांनी या काळातही कर्तव्य म्हणून शाळेत येऊन ते स्वतः झाडांना पाणी घालून त्यांची काळजी घेत आहेत. प्रत्येक रोपटे जिवंत राहावे, यासाठी जणू आईच्या मायेने त्यांचे संगोपन करत आहेत.त्यांच्या या कृतीतून शाळेबद्दलची आपुलकी आणि निसर्गाविषयीची जिव्हाळ्याची भावना प्रकर्षाने जाणवते.
ही झाडे म्हणजे विद्यार्थ्यांसारखीच आहेत,अशी भावना मनात ठेवून ते प्रत्येक झाडाशी जिव्हाळ्याने काळजी घेत आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे शाळेचा परिसर हिरवागार बनणार असून भविष्यात विद्यार्थ्यांना सावली, शुद्ध हवा आणि निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळणार आहे. पकाले यांनी बोरगावच्या सरकारी प्राथमिक मराठी शाळेला ‘पी.एम. श्री’ दर्जा मिळवून देण्यासाठी घेतलेली मेहनतही तितकीच कौतुकास्पद आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे, सुविधा विकसित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श वातावरण निर्माण करणे या बाबींमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.

About Belgaum Varta

Check Also

ज्येष्ठ ग्रामीण मराठी साहित्यिक महादेव मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनी अभिवादन

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती ग्रंथालय व निपाणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *