Tuesday , August 18 2026
Breaking News

बोरगाव मधील सार्वजनिक स्मशानभूमी परिसर हिरवीगार

Spread the love

 

पट्टन पंचायतीसह पर्यावरण प्रेमींचे प्रयत्न

निपाणी (वार्ता) : बोरगाव शहरात पर्यावरण याचा सुंदर समतोल साधण्याच्या महत्त्वाचे पाऊल उचललेले जात आहे. येथील स्मशान भूमीत पर्यावरण समतोलाच्या दृष्टीने विविध प्रकारची झाडे लावून हिरवाईला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कडक उन्हात ही या स्मशानभूमीत हिरवाईची झालर दिसून येत आहे.
यापूर्वी सार्वजनिक स्मशानभूमी ही झाडे नव्हती. नगरपंचायती तर्फे पुढाकार घेऊन येथे विविध जातींच्या वृक्षाची लागवड करण्यात आली आहे. या वृक्ष संवर्धनासाठी येथील लक्ष्मण वडर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्मशानभूमीसह पीएमश्री मराठी शाळा, लिंगायत समाज भूमी आणि इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आले आहे. त्यासाठी शहरातील विविध सामाजिक संघटना वृक्षाचे भेट देऊन पर्यावरण समतोलतेचा संदेश देत आहेत. डॉ. शंकर माळी यांनीही आपल्या अमृत महोत्सवी वाढदिनी शाळांना ७५ हुन अधिक रोपे भेट दिली. वर्ग मित्रांनी स्नेहसंमेलनच्या माध्यमातून शाळांना वृक्ष भेट देत आहेत.
——————————————————————-
‘राजकारण करीत असताना विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहराच्या सर्वांगीण विकासाबरोबर पर्यावरण समतोल रहावे, यासाठी नगरपंचायतीतर्फे प्रयत्न सुरू आहेत. सहकाररत्न उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक स्मशानभूमी नगरपंचायत कार्यालय, शहरातील खाजगी शाळा, सरकारी शाळांसह इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्याबरोबर संवर्धन ही करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.’
-दिगंबर कांबळे, नगराध्यक्ष नगरपंचायत, बोरगांव

About Belgaum Varta

Check Also

बोरगाव अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघाला ४.५९ लाखांचा निव्वळ नफा

Spread the love  निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक शेतकरी आणि संचालक मंडळांच्या सहकार्याने येथील अरिहंत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *