Tuesday , August 18 2026
Breaking News

निपाणी परिसरात बैलजोड्या बनवण्याची लगबग

Spread the love

 

माती मिळवण्यासाठी धावाधाव; शेतकऱ्यांमध्ये सणाची तयारी सुरू

निपाणी (वार्ता) : बेंदूर सण केवळ आठवड्यावर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर निपाणीसह परिसरातील कुंभारवाड्यात यंदाच्या कर्नाटकी बेंदूर सणाचे ‘वेध’ लागले आहेत. शेतीमध्ये वर्षभर साथ देणाऱ्या सर्जा-राजाच्या कृतज्ञतेचा हा सण परिसरात साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर कुंभारवाड्यात चिखलापासून बैलजोड्या बनविण्याची लगबग दिसून येत आहे
बेंदूर सणानिमित्त निपाणी, अक्कोळ, गळतगा, भिवशी, बेनाडी, आडी, कुन्नूर, सिदनाळसह परिसरातील कुंभारवाड्यात कलाकसरीनुसार मातीचे बैल तयार केले जात आहेत. तेथून चिखलाचे बैल आणून परंपरेनुसार त्यांची विधिवत पूजा केली जाते.त्याशिवाय परिसरातील अनेक गावात बैलजोडीच्या सहाय्याने कर तोडण्याचा कार्यक्रमही होणार आहे.
बेंदूर सणाविषयी बैलजोड्यांना अंघोळ घालून, त्याची शिंगे रंगविण्यासह सजून गावातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.
बेंदूर हा केवळ एक सण नसून तो शेतकऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे, जो त्यांच्या आणि त्यांच्या बैलांच्या अतूट नात्याची साक्ष देतो. या सणाला ‘पाटीलकी’चा विशेष मान असतो. ही पाटीलकीची परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. त्यांच्या हस्ते कर तोडणी करून कार्यक्रमाचा प्रारंभ होतो. यंदाच्या बेंदूर सणासाठी कुंभारवाड्यात जय्यत तयारी केली आहे. यंदा मातीच्या बैलजोड्यांचे दर २५ रुपये प्रमाणे ठेवण्यात आले आहेत. रंगीबेरंगी सजावट, पारंपरिक गाणी आणि सणाची लगबग यामुळे कुंभारवाड्यात वेगळेच चैतन्य संचारले आहे. स्थानिकांमध्ये या सणाबद्दल उत्साह असून सर्वजण एकत्र येऊन हा पारंपरिक सण आनंदाने साजरा करण्याची तयारी केली आहे.
——————————————————————–
‘पूर्वीच्या काळी बैल जोड्या व इतर मातीच्या वस्तू तयार करण्यासाठी भरपूर माती उपलब्ध होती. पण अलीकडच्या काळात माती मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे मातीच्या वस्तू तयार करणे कठीण झाले आहे. केवळ परंपरागत सणापुरतेच मर्यादितच बैलजोड्या तयार केल्या आहेत. भविष्यात माती मिळणे कठीण होणार असल्याने मातीच्या बैल जोड्या कराव्यात की नाही, असा प्रश्न आहे.’
-सुधाकर कुंभार, बेनाडी

About Belgaum Varta

Check Also

नागपंचमी यात्रेनिमित्त भाविकांची दर्शनासाठी निपाणी नागोबा मंदिरात दिवसभर गर्दी

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि परिसरात सोमवारी (ता.१७) नागपंचमी सण साजरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *