Monday , August 17 2026
Breaking News

मराठा मंडळ प्राथमिक शाळेत टिळक जयंती सहविद्यार्थी मंत्रिमंडळाचा गौरव

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील मराठा मंडळ संचलित मराठी विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्रारंभी ‌लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी फहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गांसाठी विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी पदांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. निवडून आलेल्या विद्यार्थी प्रतिनिधी व विद्यार्थिनी प्रतिनिधी यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्य, राष्ट्रप्रेम, शिक्षणविषयक विचार आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान याविषयी मनोगत व्यक्त केले.
यानंतर नव्याने निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मंत्रिमंडळातील सदस्यांचा शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यात आल्या व शिस्त, नेतृत्व, स्वच्छता, सहकार्य आणि जबाबदारीची भावना जोपासून कार्य करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
या‌वेळी शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *