Monday , August 17 2026
Breaking News

सिदनाळ सन्मति विद्यामंदिर येथे पालक सभेसह गणवेश वितरण

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मति विद्यामंदिर मधील आठवी ते दहावी आणि कन्नड माध्यम प्राथमिक विभागाची यांचे पालक सभा पार पडली. याशिवाय गणवेश वितरणाचा कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे प्रदीप पाटील, राजू पाटील, पालक प्रतिनिधी संकेत किलेदार, सुधाकर ऐवाळे उपस्थित होते.
मुख्याध्यापक एम.बी.कोल्हापुरे यांनी स्वागत केले.
प्रारंभी गुरुदेव समंतभद्र महाराजांच्या तैल चित्रासमोर दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी एन.एम.एम.एस. परीक्षेमध्ये निवड झालेल्या आदिती ऐवाळे परिवारातर्फे राजवर्धन पाटील एस.बी. बेळगुदरी व मुख्याध्यापक एम बी कोल्हापूरे यांचा सत्कार करण्यात आला.शाळेमध्ये सुरू केलेल्या एसटीएफ या उपक्रमाबद्दल माहिती देण्यात आली. प्रदीप पाटील, आदिती ऐवाळे, त्रिवेणी पाटील, श्रुती पाटील, सीमा पाटील, सुधाकर ऐवाळे यांनी मनोगत केले. कार्यक्रमाससिदनाळ, हुन्नरगी, बोळेवाडी, जैनवाडी, आडी येथील पालक उपस्थित होते. यावेळी आठवीच्या विद्यार्थ्यांना संस्थेकडून गणवेश व जैन बुक मॅन्युफॅक्चरर- हुबळी यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास सुकुमार मगदूम, एस. पी. बेळगुदरी, शामल हिरेकुडे, शितल मगदूम, यू.पी. पाटील, त्रिवेणी देसाई, त्रिवेणी पाटील, श्रुती पाटील, निकिता मगदूम, दादा मगदूम यांच्यासह शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. पी. एम. तोटद यांनी सूत्रसंचालन केले.‌यू.पी. पाटील यांनी आभार मानले.

About Belgaum Varta

Check Also

निपाणी येथील काँग्रेस कार्यालयात स्वातंत्र्य दिन कार्यक्रम

Spread the love  निपाणी (वार्ता) : निपाणी येथील माजी आमदार दिवंगत काकासाहेब पाटील यांच्या कार्यालयात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *