Monday , September 7 2026
Breaking News

निपाणीतील चिमगांवकर गल्लीतील विठ्ठल मंदिरात 18 पासून अखंड हरिनाम सप्ताह

Spread the love

 

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील बागवान ओढा चिमगावकर गल्लीतील श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठोबा देव प्रतिष्ठानकडून मंगळवार (18 ते 25) ऑगष्ट अखेर अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. पारायण अधिष्ठान सतीश काजवे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. सोहळा काळात दररोज पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ, प्रवचन, हरिकीर्तन, हरिजागर असे कार्यक्रम होणार आहेत.
मंगळवारी (ता.18) बळीराम तांबेकर- जैन्याळ, बुधवारी (ता.19) दत्तात्रय पाटील-तवंदी, गुरुवारी (ता. 20) भागवत संत महाराज -नणंदी, शुक्रवारी (ता. 21) अर्जुन जाधव -शिप्पूर, शनिवारी (ता. 22) एकनाथ गुरव-मळगे, रविवारी (ता.23) शंकर हिरेमठ-निपाणी, डॉ. शिवाजी पन्हाळकर-उत्तुर, सोमवारी (ता. 24) कुलदीप साळुंखे-कारभारवाडी यांची प्रवचन व कीर्तन सेवा होणार आहे. याशिवायविविध गावातील भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. 24 रोजी सायंकाळी दिंडी प्रदक्षिणा होईल. 25 रोजी सकाळी सत्यजित निकाडे-कुर्ली यांचे काल्याचे किर्तन झाल्यानंतर दुपारी महाप्रसाद वाटप होणार आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन सहकार्य करण्याचे आवाहन विठोबा देव प्रतिष्ठान उत्सव कमिटीने केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

शालेय स्पर्धा सकारात्मक दृष्टिकोन वाढविणारे प्रभावी माध्यम; दशरथ कुंभार

Spread the love  कुर्लीत कथालेखन स्पर्धा निपाणी (वार्ता) : शालेय स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांना जिंकणे, हरणे यापेक्षा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *