

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील निपाणी तालुका छायाचित्रकार आणि व्हिडिओग्राफर संघटनेतर्फे बुधवारी (ता.२६) ए.आय. बाबत एकदिवशीय शिबीर पार पडले. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष संजय सूर्यवंशी तर प्रमुख पाहुणे म्हणून येथील व्हिडिओ, छायाचित्रकार मार्गदर्शक दिगंबर कोळेकर उपस्थित होते.
प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रजनन झाले.
शिबिरात दिगंबर कोळेकर यांनी, छायाचित्र, व्हिडिओ, सिनेमॅटिक रिल्स याबाबत माहिती दिली. कोल्हापूर येथील किसान फोटो प्लाझा, इचलकरंजी येथील उत्सव कलर लॅब यांच्यातर्फे फोटो व्हिडिओचे प्रदर्शन मांडले होते. बंडू कुंभार यांनी अपघाती विम्या बाबत माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ९० छायाचित्रकार उपस्थित होते.
शिबिरास संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप भोईटे, संतोष स्वामी, रतन कांबळे, श्रावण कांबळे, राजू शिरोळे, श्रीकांत कुंभार, विजय कुरबेर, समीर शेलार, जमीर नाईक, संतोष साळुंखे, सानिका ढंग, स्वाती पाटील, विजय नार्वेकर, संतोष दरेकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संदेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. विनायक पाटील यांनी आभार मानले.


Belgaum Varta Belgaum Varta