Sunday , April 5 2026
Breaking News

LOCAL NEWS

बिजगर्णीत कुस्ती आखाडा भरविण्याचा निर्णय

बेळगाव : बिजगर्णी (ता.बेळगाव) येथील श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने महाशिवरात्री निमित्त एक मार्च रोजी (२०२२) कुस्तीचा भव्य आखाडा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठकित सर्वानुमते ठरले आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वसंत लक्ष्मण अष्टेकर होते. यावेळी के. आर. भाष्कळ यांनी उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रास्ताविक वाय. पी. नाईक …

Read More »

सरकारी मराठी शाळा नंबर 5 येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

बेळगाव : मराठी शाळा नंबर 5 चव्हाट गल्ली बेळगाव येथे झालेल्या रांगोळी व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. दि. 2 डिसेंबर रोजी रांगोळी स्पर्धा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. आजच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून बार असोसिएशन बेळगावचे उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, माजी विद्यार्थी संघटनेचे …

Read More »

आश्वासनानंतर शेतकर्‍यांचे आमरण उपोषण मागे

बेळगाव : सहकार खात्याच्या सहाय्यक निबंधकांसह बँकेच्या अधिकार्‍यांनी कृषी कर्जाबाबत ठोस आश्वासन दिल्यामुळे मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाच्या विरोधात छेडलेले आमरण उपोषण शेतकर्‍यांनी आज मागे घेतले. मुतगे कृषी पत्तीन सहकारी संघाने कृषी कर्ज देण्यास टाळाटाळ चालविल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकर्‍यांनी काल मंगळवारी संघाच्या कार्यालयात टाळे ठोकून आमरण उपोषण सुरू केले होते. …

Read More »

37 व्या स्टेट रोलर स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये बेळगावच्या स्केटिंगपटुंचे स्पर्धेत घवघवीत यश

बेळगाव : कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशन आयोजित 37 व्या राज्यस्तरीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप-2021 स्पर्धेत बेळगावच्या स्केटिंगपटूंनी चमकदार कामगिरी केली. बेंगळूर येथील सिटी स्केटर्स ट्रॅक आणि कस्तुरी नगर ट्रॅकवर दिनांक 25 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्ह्यातील स्केटिंगपटूंनी 17 सुवर्ण, 3 रौप्य आणि 12 कांस्य पदकांसह एकंदर …

Read More »

इंडियन मेडिकल असोसिएशनकडून पोलिसांना प्रशिक्षण कार्यशाळा

बेळगाव : इंडियन मेडिकल असोसिएशन बेळगाव शाखेच्यावतीने बेळगाव शहर पोलिसांसाठी एक विशेष कार्यशाळा घेण्यात आली. स्वत:चा जीव संपवून घेणे, भाजून घेणे किंवा विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणे अशा प्रकारात नागरिकांना हाताळण्याचे प्रशिक्षण यावेळी पोलिसांना देण्यात आले. 60 हून अधिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी या पायाभूत कार्यशाळेमध्ये सहभागी …

Read More »

महापरिनिर्वाण दिन पूर्वतयारीची बैठक

बेळगाव : भारतीय बौद्ध महासभेच्यावतीने येत्या 6 डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेली पूर्वतयारीची बैठक आज सकाळी पार पडली. सदाशिवनगर येथील बौद्ध विहारमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये सालाबादप्रमाणे महापरिनिर्वाण दिनानिमित्त 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथून सामाजिक एकता प्रकाश फेरीचे (कॅन्डल मार्च) आयोजन करणे. याचप्रमाणे येत्या …

Read More »

प्रा. सुभाष सुंठणकर यांचा वाड्:मय चर्चा मंडळतर्फे सत्कार

बेळगाव : बेळगावचे प्रसिद्ध विनोदी कथा लेखक, रसायन शास्त्राचे प्राध्यापक, मंडळाचे ज्येष्ठ माजी कार्यकारिणी सदस्य प्रा. सुभाष सुंठणकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त शनिवार दि. 27 नोव्हेंबर 2021 रोजी मंडळाच्या सभागृहात मंडळाचे ज्येष्ठ शाखा चिटणीस आणि ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, फळकरंडी, पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक …

Read More »

बी. के. कॉलेजमध्ये झंकार भित्तीपत्रकाचे अनावरण

बेळगाव : बेळगाव शहरातील भाऊराव काकतकर महाविद्यालयामध्ये (बी. के. कॉलेज) नुकताच झंकार आणि भित्ती पत्रकाचा अनावरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आरपीडी महाविद्यालयाच्या प्राचार्य शोभा नाईक आणि अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियुद्ध मुकुंद किल्लेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे …

Read More »

दोषी विमा कंपन्यांवर कारवाई करू : कृषी मंत्री बी. सी. पाटील

हुबळी : पीक विम्याची फसवणूक केली जाणार नाही. फसवणूक करणार्‍या कंपन्यांना ताकीद देण्यात आली असून ज्या कंपन्यांवर आरोप करण्यात आले आहेत, अशा कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन कृषी मंत्री बी. सी. पाटील यांनी दिले आहे. हुबळी येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली असून आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कर्जाबद्दल नोंदी …

Read More »

येत्या 19 डिसेंबरला होणार सौंदत्तीची शाकंभरी यात्रा

बेळगाव : सौंदत्ती श्री यल्लमा देवीची शाकंभरी यात्रा येत्या 19 डिसेंबरला होणार असून दोन वर्षांनी यंदा ही यात्रा होणार असली तरी महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भक्तांना यात्रेत सहभागी होण्याची संधी मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. गेल्या दोन वर्षापासून शाकंभरी यात्रेत कोरोना प्रादुर्भावामुळे भक्तांना यात्रेत सहभागी होता आलेले नाही. दरवर्षी …

Read More »