Thursday , May 28 2026
Breaking News

LOCAL NEWS

बेळगाव शहर उपनगरातील विविध भागात वीज पुरवठा खंडित

  बेळगाव : बेळगाव शहरातील श्रीनगर आणि सुवर्णसौध या महत्त्वाच्या विद्युत उपकेंद्रांमध्ये चौथ्या त्रैमासिक देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. यामुळे येत्या रविवारी (८ मार्च) शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. हुबळी विद्युत पुरवठा कंपनीच्या शहर विभागाने …

Read More »

राज्याचा अर्थसंकल्प जनतेची दिशाभूल करणारा : भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सादर केलेला कर्नाटक राज्याचा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरला असून महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना दिलासा देणाऱ्या ठोस व दीर्घकालीन योजना या अर्थसंकल्पात स्पष्टपणे दिसत नाहीत, अशी टीकात्मक प्रतिक्रिया भाजप महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केली …

Read More »

युवा समितीतर्फे 15 मार्च रोजी ‘इथे ओशाळाला मृत्यू’ नाट्यप्रयोग

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव यांच्यातर्फे शिवगणेश प्रोडक्शन्स सिंधुदुर्ग, मुंबई निर्मित ‘इथे ओशाळला मृत्यू’ या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची धगधगती शौर्यगाथा असलेल्या नाटकाचा प्रयोग येत्या रविवार दि. 15 मार्च 2026 रोजी दुपारी 3 आणि सायंकाळी 7 वाजता आयोजित करण्यात आला आहे. उपरोक्त ऐतिहासिक नाटक बेळगाव शहरातील कोनवाळ …

Read More »

कडोलीत आज मराठी भाषा गौरव दिवस

  कडोली : येथील मराठी साहित्य संघातर्फे शनिवार दि. 7 मार्च 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिवस (कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस) साजरा करण्यात येणार आहे. मराठी साहित्य संघाच्या श्री कलमेश्वर वाचनालयात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून कडोलीतील श्री शिवाजी हायस्कुलच्या मराठी विषयाच्या शिक्षिका सौ. एस. …

Read More »

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त बेळगावात उद्या कवी संमेलन

  बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने मराठी भाषा गौरव दिवस आणि जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार दिनांक ७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता मराठी विद्यानिकेतन, बेळगाव येथे होणार आहे. या कवी संमेलनात मराठी भाषा तसेच महिला विषयावर आधारित …

Read More »

कर्तव्य कठोर… पण मन माणुसकीने ओथंबलेले!

  डी डी पी यू श्री एम एम कांबळे यांचे भावस्पर्शी छायाचित्र! बेळगाव : द्वितीय पी.यू.सी.ची परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा. या एका परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षे कष्ट घेतलेले असतात. पण कधी कधी नियती वेगळीच परीक्षा घेते. अशाच एका अपघातग्रस्त विद्यार्थ्याने जखमी अवस्थेतही परीक्षा देण्याचा निर्धार केला आणि …

Read More »

अनंत जांगळे : शांत, सुस्वभावी जिंदादिल व्यक्तीमत्व

  सर्वसामान्य घरात जन्मलेली पण स्वतःच्या कर्तृत्वाने जनमानसात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारी काही माणसे आपल्याला समाजात दिसतात त्यापैकीच एक म्हणजे अनंतराव जांगळे. बेळगावातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि आनंदवाडी येथील रहिवासी रामचंद्र जांगळे हे अनंत जांगळे यांचे पिता. बालपणापासूनच अनंतरावांवर सामाजिक कार्याचे संस्कार झाले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग शिक्षण घेतलेल्या अनंतरावांना …

Read More »

चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीला मंत्री एम. बी. पाटील यांचा पाठिंबा

  चिक्कोडी : येडूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एम. बी. पाटील यांनी चिक्कोडी जिल्ह्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिला. याचवेळी त्यांनी केंद्रातील भाजप सरकारचे परराष्ट्र धोरण आणि राज्यातील भाजप नेत्यांच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. येडूर येथील स्वामीजींच्या संरक्षण मागणीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे स्पष्ट करत एम. बी. पाटील यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा …

Read More »

येडूर : श्री वीरभद्रेश्वर-भद्रकाली देवीचा कल्याण महोत्सव साजरा

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील सुक्षेत्र येडूर ग्रामी श्री वीरभद्रेश्वर आणि भद्रकाळी देवीच्या कल्याण महोत्सवानिमित्त श्री वीरभद्रेश्वराचा रौप्य रथोत्सव महिलांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात पार पडला. श्रीशैल जगद्गुरू डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजींच्या दिव्य सान्निध्यात नीलांबिका प्रकाश हुक्केरी यांनी रथोत्सवास हिरवा कंदिल दाखवला. यावेळी महिलांनी अत्यंत भक्तीभावाने रौप्य रथ ओढला. ‘हर …

Read More »

बापट गल्लीतील व्यापाऱ्यांचा महानगरपालिकेच्या दंडात्मक कारवाईला विरोध

  बेळगाव : बेळगाव शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून महानगरपालिकेकडून व्यापारी परवाना तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता थेट दंडात्मक कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. या कारवाईच्या निषेधार्थ बापट गल्लीतील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत आंदोलन केले. अचानक करण्यात आलेल्या तपासणीमुळे आणि तात्काळ दंड …

Read More »