
बेळगाव : बेळगाव सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या व कॅन्टोन्मेंट बोर्ड उर्दू शाळा आयोजित कॅम्प विभागीय माध्यमिक आंतरशालेय मुला-मुलींच्या फुटबॉल स्पर्धेत सेंट पॉल्स, सेंट झेवियर्स हायस्कूल संघानी आपापल्या प्रतिस्पर्धीय संघावर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुलीं गटातील अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स हायस्कूल संघाने तत्त वर्षाचा विजेता सेंट जोसेफ हायस्कूल संघावर चुरशीच्या लढतीत सडन डेथवर 8-7 असा विजय संपादन करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. मुलांच्या गटातील अंतिम सामन्यात सेंट पाॅल हायस्कूल संघाने सेंट झेवियर्स हायस्कूल संघावर 2-0 असा विजय संपादन करत स्पर्धेचे अजिंक्यपद संपादन केले.
कॅम्प मधील सेंट पॉल्सच्या मैदानावर फुटबॉल स्पर्धेतील मुलींच्या अंतिम सामन्यात सेंट झेवियर्स स्कूल संघाने बलाढ्य सेंट जोसेफ हायस्कूल संघाला चुरशीच्या लढतीत मध्यंतरापर्यंत शून्य बरोबरीत रोखले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात पुन्हा दोन्ही संघांनी परस्परावर आक्रमक चढाया केल्या. आघाडीच्या फळीतील फुटबॉलपटूंनी गोल करण्याच्या अनेक संधी दवडल्या. निर्धारित वेळेत हा सामना शून्य बरोबरीत सुटल्यामुळे पंचांनी पेनाल्टी शूटआउट वर निर्णय घेतला. पेनाटी शूट आउट वर दोन्ही संघांनी प्रत्येकी चार गोल करून 4-4 बरोबरी साधली. पुन्हा पंचांनी सडन डेथवर निर्णय घेतला यावेळी सेंट झेवियर्स स्कूल संघाने सेंट जोसेफ हायस्कूल संघावर 4-2 असा विजय करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

मुलांच्या अंतिम सामन्यात सेंट पॉल्स हायस्कूल संघाने सेंट झेवियर्स हायस्कूल संघावर 2-0 असा सहज विजय संपादन केला सेंट पॉल्स हायस्कूल तर्फे अब्दुल मतीन नेवीन पत्की यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून शहर पीईओ जे. बी. पटेल, मुख्याध्यापिका फरिदा बिस्ती यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. कॅम्प विभाग शारीरिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष नागराज भगवंतन्नवर, प्रशांत देवदानम, अँथोनी डिसोजा, स्पर्धा सेक्रेटरी साकीब बेपारी, प्रकाश बजंत्री, इम्रान बेपारी, रविशंकर मालशेट, मानस नायक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta