Sunday , September 20 2026
Breaking News

हार्दिक पंड्या टीम इंडियाचा नवा कर्णधार, आयर्लंड दौऱ्यासाठी संधी

Spread the love

मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी आयर्लंडच्या संघाने आपला संघ जाहीर केला आहे. दरम्यान, भारतीय संघातून एक मोठी बातमी समोर येत आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, हार्दिक पंड्याला आता भारतीय संघात मोठी जबाबदारी मिळणार आहे. भारतीय संघ सध्या ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मायदेशात द. आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिका खेळत आहे. या मालिकेत पंतच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पहिल्या दोन सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर तिसरा सामना जिंकून भारताने मालिकेत कमबॅक केले. मात्र पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या संघावर चाहत्यांस अनेक माजी क्रिकेटर नाराज आहेत.
दरम्यान, आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाला विजेतेपद मिळवून देणा-या हार्दिक पंड्याकडे आयर्लंड दौ-यात भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाईल अशा चर्चांना उधान आले आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरी हार्दिक आता भारतीय संघाचा कर्णधार असेल असे अनेक तज्ज्ञांना विश्वास आहे.

About Belgaum Varta

Check Also

टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक, पाकिस्तानचा 61 धावांनी धुव्वा

Spread the love  कोलंबो : आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *