Tuesday , April 23 2024
Breaking News

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या पालकांनी घाबरु नये : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Spread the love

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांनाही धोका असल्याचं सांगण्यात आलं असलं तरीही या चिमुकल्यांच्या पालकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही, असं म्हणत त्यांनी राज्यातील जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला.
लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधं आणि उपचारांबाबतही उद्धव ठाकरे यांनी तज्ज्ञांसमोर आपलं मत मांडलं. गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो. लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे. कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही हे लक्षात घ्या. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पाउले टाकली आहेत. पुढील काळासाठी सुविधाही वाढवत आहोत.लसीकरणाच्या बाबतीतही मी परत सांगतो की, १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे, अशी माहिती देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिली.
कोरोनाच्या संकटाची तीव्रता पाहता लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कठोर होता, पण लॉकडाऊनच्या निर्णयाबाबत आपली कटुपणा घेण्याची तयारी आहे असं म्हणत त्यांनी आपली ठाम भूमिका मांडली. राज्यातील नागरिकांच्या सहकार्यामुळंच कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

About Belgaum Varta

Check Also

विद्यार्थ्यांच्या भगव्या कपड्यांवर मुख्याध्यापकांचा आक्षेप; संतप्त जमावाकडून शाळेची तोडफोड

Spread the love  तेलंगणा : तेलंगणातल्या मंचेरियल जिल्ह्यातील एका मिशनरी शाळेवर हल्ला झाल्याचं प्रकरण नुकतंच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *