Monday , December 4 2023

हडलगे रोपवाटीकेमध्ये लाखो रोपे तयार

Spread the love

शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे वनविभागाकडून अवाहन

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : कोवाड- नेसरी रस्त्यालगत हडलगे घटप्रभा नदि बंधाऱ्यानजीक असणाऱ्या शासनाच्या रोपवाटीकेमध्ये विविध प्रकारची लाखो रोपे तयार करण्यात आली असून अत्यल्प किमतीत रोपे विक्री केली जात आहेत. याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन वनक्षेत्रपाल हणमंतराव जाधव यांनी केले आहे.
गडहिंग्लज उपविभागात येणाऱ्या या रोपवाटीकेमध्ये दरवर्षी हजारो रोपे निर्माण केली जात आहेत. यासाठी वनपाल एस. एस. पाटील वनमजूर दत्तात्रय पाटील, आर. आर. पाळेकर यांचे योगदान प्रचंड आहे. अगदी दगड जमिनीवर प्रतिकूल परिस्थितीत एवढी प्रचंड रोपे निर्माण केली आहे. यामध्ये या विभागात वाढणाऱ्या जास्तित जास्त उपयुक्त असणारी रोपे तयार करण्यात आली आहेत. यामध्ये काजूची १६ हजार रोपे, चिंच १२ , जांभूळ १३ हजार रोपे तयार आहेत . सागवानची १८ हजार रोपे , करंज , सावर , बांबू , सिंधी , सिताफळ , अशोक , गुलमोहर , वड, सिल्वर , सुरू , बेल , आंबा , उंबर , अर्जुन , मोहगुनी , वाळा , रक्तचंदन , गोटख चिंच , आक्रो- कॉक्रोज , वेल्टा फार्म आदि जातिची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत . हि रोपे अगदी कमित कमी किमतीत १० रूपयापासून ते ५० रूपया पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहेत . शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन वन विभागाकड्रन करण्यात आले आहे.

फोटो -हडलगे येथील रोपवाटीकेमध्ये असणाऱ्या विविध रोपांची माहिती देताना वनमजूर दत्तात्रय पाटील

About Belgaum Varta

Check Also

व्यापाऱ्याचे अपहरण अन् खंडणी प्रकरणी फरारी विशालला अटक

Spread the love  बेळगाव : रिअल इस्टेट व्यावसायिकाच्या खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर हिंदवाडी येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *