मध्यप्रदेश : मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकाल मंदिरात मोठं अग्नितांडव घडलं आहे. महाकाल मंदिरातील भस्मा आरतीदरम्यान मंदिरातील गाभाऱ्यातच भीषण आग लागली. आगीत पुजारी होरपळून गंभीररित्या जखमी झाले आहेत. होळीमध्ये गुलाल टाकल्यानं आग भडकली आणि संपूर्ण गर्भगृहात पसरली. जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू …
Read More »बेळगावमधून जगदीश शेट्टर, उत्तर कन्नडमधून विश्वेश्वर हेगडे कागेरी
बेळगाव : अखेर भाजपची यादी जाहीर झाली असून बेळगावातून जगदीश शेट्टर आणि उत्तर कन्नडमधून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांची उमेदवारी अंतिम झाली आहे. उत्तर कन्नड मधून भाजपने विद्यमान खासदार अनंतकुमार हेगडे यांना डावलले असून विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना उमेदवारी दिली आहे. अखेर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर यांचे नाव अंतिम …
Read More »लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला २० जागा
मुख्यमंत्र्यांचा विश्वास; उमेदवार निवडीत गोंधळ नसल्याचा दावा बंगळूर : विधानसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील जनतेला दिलेल्या पाच हमी योजनांची पूर्तता करून आम्ही वचनपूर्ती केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघात विजय निश्चित असल्याचा विश्वास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केला. काँग्रेसच्या प्रलंबित याद्या आज किंवा उद्या जाहीर करू. उमेदवार निवडीबाबत …
Read More »कर्नाटकाला विशेष अनुदान दिले नसल्याचा आरोप पूर्णपणे खोटा
केंद्रीय मंत्री सितारामन; कर्नाटकाच्या याचिकेवर प्रतिक्रीया बंगळूर : दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन निधी (एनडीआरएफ) अंतर्गत तातडीने अनुदान देण्याचे निर्देश केंद्राला द्यावेत यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शनिवारी दिली होती. त्यावर त्यावर प्रतिक्रीया देताना केंद्रीय वित्त मंत्री निर्मला …
Read More »बेकायदा दत्तक प्रकरण; सोशल मीडिया स्टार सोनू गौडा हिला अटक
रायचूर : अल्पवयीन मुलाला बेकायदेशीरपणे दत्तक घेतल्याप्रकरणी प्रसिद्ध सोशल मीडिया स्टार सोनू गौडा हिला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस आणि अधिकाऱ्यांनी त्या मुलाला मूळ गावी रायचूरला घेऊन गेले आहेत. सोनू गौडा हिने नुकताच रायचूरमधील एका मुलाला दत्तक घेतल्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. पण सोनू गौडावर बेकायदेशीरपणे मूल …
Read More »गांजाची अवैध विक्री; आरोपीला अटक
बेळगाव : बेळगावच्या गणाचारी गल्लीत अवैधरित्या गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला खडेबाजार पोलिसांनी अटक केली. आकाश सुनील परीट असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गणाचारी गल्लीत गांजा विक्री होत असल्याच्या गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. छाप्यादरम्यान 176 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि 14,200 रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.
Read More »मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जोरदार खलबतं, महायुतीचा जागावाटपाचा तिढा आजच सुटणार?
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी सध्या प्रचंड खलबतं सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात वर्षा बंगल्यावर बैठक सुरु आहे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे महायुतीच्या या तीनही प्रमुख नेत्यांची काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह …
Read More »अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत ३१ मार्च रोजी महारॅलीचंं आयोजन!
नवी दिल्ली : दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. या निषेधार्थ इंडिया आघाडीने एकजूट दाखवली असून देशभर निदर्शने केली जात आहेत. तसंच, आता ३१ मार्च रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानावर आता महारॅलीही काढण्यात येणार आहे. इंडिया …
Read More »खानापूर म. ए. समितीची मंगळवारी बैठक
खानापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार देण्यासंदर्भात विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची व्यापक बैठक मंगळवार दिनांक 26 मार्च रोजी दु. 2 वाजता कै. व्ही. वाय. चव्हाण सभागृह शिवस्मारक येथे बोलाविण्यात आली आहे. तरी तालुक्यातील मराठी भाषिक समितीप्रेमी नागरिकांनी या बैठकीला बहुसंख्येने उपस्थित …
Read More »दहावी परीक्षेस उद्यापासून प्रारंभ
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाची मानल्या दहावीच्या परीक्षेला सोमवार (ता. २५) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने दहावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण केली असून रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर दहावीच्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांक घालण्याचे काम पूर्ण केले जाणार असून रंगपंचमी दिवशी दहावीचा पहिला पेपर पार पडणार आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रांवर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta