Wednesday , December 17 2025
Breaking News

Belgaum Varta

बडेकोळमठजवळ बस उलटली; दोघांचा मृत्यू

  बेळगाव : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री बडेकोळमठ घाटजवळ गोगटे कंपनीची बस उलटून दोन जणांचा मृत्यू झाला. हुबळीहून पुण्याला जाणारी गोगटे कंपनीची खासगी बस उलटली. चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला. बसमधून एकूण १२ जण प्रवास करत होते. यामध्ये एका महिला आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. हिरेबागेवाडी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी आणि …

Read More »

एकात्मतेचा संदेश देत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली श्रीमूर्तीची प्रतिष्ठापना!

  बेळगाव : गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि एकतेचा संदेश दिला. बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी यावर्षीही त्यांच्या घरी गणेश मूर्तीची स्थापना केली. तत्पूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी बेळगावच्या चन्नम्मा सर्कलमधील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. बुधवारी, संपूर्ण शहरात भाविक गणेशाची स्थापना करण्यात व्यस्त होते. जिल्हाधिकारी त्यांच्या कुटुंबासह …

Read More »

डीसीसी बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट : चन्नराज हट्टीहोळी यांची माघार; पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची माहिती

खानापूर : बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीतून विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी माघार घेतली असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी एका व्हिडिओ संदेशातून दिली. पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, “डीसीसी बँकेची ऑक्टोबर महिन्यात होणारी निवडणूक पक्षविरहीत आहे. सदर निवडणूक कोणत्याही पक्षाच्या वतीने लढविण्यात येत नाही. खानापूरमधून …

Read More »

कै. बहिर्जी शिरोळकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, बहिर्जी शिरोळकर पदवी पूर्व महाविद्यालय, हंदिगनूर येथे 26 ऑगस्ट 2025 रोजी “समाजभूषण” लोकशाहीर बहिर्जी शिरोळकर यांचा 36 वा स्मृतिदिन कार्यक्रम पार पडला. शाळा सुधारणा होते. कमिटीचे उपाध्यक्ष श्री. नारायण पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठावर बहिर्जी शिरोळकर यांचे नातू श्री. दिनेश शिवाजीराव शिरोळकर, …

Read More »

भक्तीभावात, जल्लोषात गणरायाचे आगमन!

  बेळगाव : काही दिवसांपासून आपल्या गणरायाच्या प्रतीक्षेत असलेल्या गणेश भक्तांची प्रतीक्षा अखेर आज संपली. आज पहाटेपासूनच बेळगाव शहर तसेच उपनगरात घरोघरी गणरायाचे भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले. आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणरायाचे स्वागत करण्यात आले. …

Read More »

रॅपिड ॲक्शन फोर्सचे बेळगावात पथसंचलन

  बेळगाव : श्री गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या हेतूने रॅपिड ॲक्शन फोर्स (आरएएफ) आणि स्थानिक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे शहरातील विविध मार्गांवर लक्षवेधी पथसंचलन झाले. या पथसंचलनाला शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा चौकातून प्रारंभ झाला . तेथून चव्हाट गल्ली, शेट्टी गल्ली, शास्त्री चौक, दरबार गल्ली, खडेबाजार, …

Read More »

नादब्रह्मा भजन सोहळा भक्तीपूर्ण वातावरणात

    बेळगाव : तारांगण, प्रवीण हॉलिडे आणि सुनील भोसले यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावच्या भजनी मंडळ यांना एक व्यासपीठ म्हणून नादब्रह्म भजन सोहळ्याचे आयोजन केले गेले हा कार्यक्रम नुकताच मिलेनीयम गार्डन येथे पार पडला. कन्सल्टिंग इंजिनियर सुनील भोसले व सामाजिक कार्यकर्त्या रेणू भोसले, प्रवीण बेळगावकर, प्रकाश कालकुंद्रीकर तारांगणच्या संयोजका अरुणा …

Read More »

धर्मस्थळ प्रकरण : तिमारोडी यांच्या निवासस्थानावर एसआयटीचा छापा; बुरुडे चिन्नय्याला आश्रय दिल्याचा आरोप

  बंगळूर : आज सकाळी, एसआयटीने उजिरे येथील महेश शेट्टी तिमारोडी यांच्या निवासस्थानी छापा टाकला, त्यांनी बुरुडे चिन्नय्या यांना आश्रय दिला होता, ज्यांनी धर्मस्थळाभोवती शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा केला होता. बेलतंगडी न्यायाधीशांकडून शोध वॉरंट मिळवल्यानंतर एसआयटी पथकाने आरोपी बुरुडे चिन्नय्या यांना सोबत घेऊन महेश शेट्टी आणि जवळच असलेल्या त्याचा भाऊ …

Read More »

संघाचे गीत गाईल्याने कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो : डी. के. शिवकुमार

    काँग्रेसशी माझे नाते भक्त आणि देवासारखे बंगळूर : उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी विधानसभेच्या कामकाजादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गीताच्या ओळींचा उल्लेख केला होता. यामुळे बराच गोंधळ उडाला आणि काँग्रेस नेत्यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला. बी. के. हरिप्रसाद यांनी, केपीसीसी अध्यक्ष म्हणून …

Read More »

वैष्णोदेवी धाममध्ये भूस्खलन; 31 जणांचा बळी

  जम्मू : जम्मूतील कटरा येथील वैष्णोदेवी धाम येथील अर्धकुमारी मंदिराजवळ काल (26 ऑगस्ट) मंगळवारी झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा 31 वर पोहोचला आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजता वैष्णोदेवीच्या जुन्या मार्गावरील इंद्रप्रस्थ भोजनालयाजवळ ही दुर्घटना घडली. काल रात्री उशिरापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, परंतु सकाळी हा आकडा वाढला. प्रशासनाचे …

Read More »