Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

म. ए. युवा समितीची महत्वपूर्ण बैठक उद्या

  बेळगाव : कन्नडसक्ती विरोधात ११ ऑगस्ट रोजी काढण्यात येणार आहे. या मोर्चा संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक शनिवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता युवा समिती कार्यालय, कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे बोलाविण्यात आली आहे तरी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन …

Read More »

मोकाट फिरणाऱ्या गायींसंदर्भात श्रीराम सेना हिंदुस्थान ग्रामीणचे पोलीस आयुक्तांना निवेदन

  बेळगाव : बेळगाव शहरातील रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या गाईंकडे त्यांच्या मालकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाने या गोमातांची काळजी घेऊन त्यांना गोशाळेमध्ये सोडावे. अन्यथा ते काम श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणला पार पाडावे लागेल, असे विनंती वजा इशाऱ्याचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थान बेळगाव ग्रामीणच्यावतीने आज पोलीस आयुक्तांना सादर करण्यात आले. श्रीराम …

Read More »

शुभम शेळके यांची “हद्दपारी” सुनावणी पुढे ढकलली

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना माळमारुती पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून बेळगावच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त यांनी हद्दपार पारीची नोटीस बजावली होती, सदर नोटीसीची सुनावणी न्याय दंडाधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेले कायदा व सुव्यवस्थेचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांच्या समोर आज दिनांक …

Read More »

गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर बसचे नियंत्रण सुटून अपघात ; १४ प्रवासी जखमी

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील गणेशपूर – बेळगुंदी मार्गावर आज शुक्रवारी सकाळी बेळगावहून बेळगुंदीच्या दिशेने जात असलेल्या बसचा उचगाव क्रॉसजवळ स्टेअरिंग तुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. बस रस्त्यालगत असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या घटनेत दोन शालेय विद्यार्थी किरकोळ जखमी जाळे असून इतर प्रवाशांना सौम्य दुखापत झाली आहे. मात्र सुदैवाने …

Read More »

बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांचे बेळगुंदी केंद्र पातळीवरील क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश

  मुला – मुलींच्या चॅम्पियनशिपसह केंद्रात अव्वल बेळगाव : बेळगुंदी केंद्र पातळीवरील माध्यमिक विभागीय क्रीडा स्पर्धेत बालवीर विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत मुला- मुलींच्या चॅम्पियनशिपसह 17 सुवर्णपदक 8 सिल्वर व 4 ब्रॉंझ पदक मिळवत केंद्रात अव्वल येण्याचा मान मिळविला. मुलांमध्ये रितेश संजीवकुमार देसाई या विद्यार्थ्याने 100 मीटर व 200 …

Read More »

खानापूर तहसील कार्यालयाची लोकायुक्तांकडून पाहणी

  खानापूर : खानापूरमधील तहसील कार्यालयासह उपनिबंधक कार्यालय आणि एम.सी.एच. रुग्णालयाला लोकायुक्त न्यायमूर्ती सी. एस. पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक भेट दिली. या पथकाने कार्यालयांच्या कामकाजाची आणि व्यवस्थेची पाहणी केली. लोकायुक्त पथकाने सरकारी कार्यालयात नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, कार्यालयातील एकूण व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांसंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. यावेळी बेळगाव …

Read More »

विहिरीत पाय घसरुन पडल्याने सोसायटी कर्मचाऱ्याचा मृत्यू

  खानापूर : खानापूर तालुक्यातील इदलहोंड येथील ३६ वर्षीय दिग्विजय मनोहर जाधव या तरुणाचा आपल्या शेतातील विहिरीत पाय घसरुन पडल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवारी सकाळी उघडकीस आली. दिग्विजय जाधव हे गर्लगुंजी येथील पिसेदेव सोसायटी शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, दिग्विजय जाधव आज सकाळी ६ वाजल्यापासून बेपत्ता …

Read More »

मटका खेळणारे, गांजा सेवन तसेच शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी पोलिसांची कारवाई

  बेळगाव : बेळगाव पोलिसांनी मटका जुगार तसेच अमली पदार्थ विरोधी मोहीम करण्यात आली आहे हिरेबागेवाडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून बुधवारी दोघांना अटक करून त्यांच्याकडील रोख २५०० रुपये रुपये, मोबाईल फोन व मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अनिल रामा चौगुले (नवी गल्ली, बेळगाव) व प्रकाश कुरंगी …

Read More »

शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरूच

  बेळगाव : बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांवर लोकायुक्तांचे धाडसत्र सुरू असल्यामुळे बेळगाव शहरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. बेळगाव शहरातील सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचाराचा सुळसुळाट चालू असल्याची तक्रार वारंवार होत होती. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सरकारी कार्यालयांवर धाडसत्र मोहीम सुरू केली आहे. बेळगाव स्मार्ट सिटी कार्यालय, महानगरपालिका, उपनिबंधक कार्यालय, तालुका …

Read More »

कर्नाटक प्रशासनाने घेतली मोर्चाची धास्ती!

  बेळगाव : येत्या 11 ऑगस्ट रोजी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नड सक्ती विरोधात महामोर्चाचे आयोजन केले आहे या मोर्चाची धास्ती कर्नाटक प्रशासनाने घेतली असून या संदर्भात चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी चर्चेसाठी बोलावून घेतले होते. चर्चे दरम्यान प्रशासनाने मध्यवर्ती …

Read More »