बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस भूषविणार असून दुसऱ्या सत्रात कवी संमेलन होणार आहे. याचे अध्यक्षपदी पत्रकार …
Read More »राजर्षी शाहू महाराजाना सांबऱ्यात अभिवादन!
बेळगाव : लाल मातीच्या कुस्तीला प्रोत्साहन देणारे लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या शंभराव्या स्मृतिदिनानिमित्त सांबरा कुस्ती कमिटी आणि ग्रामस्थांच्यावतीने शंभर सेकंद स्तब्ध उभे राहून अभिवादन करण्यात आले. साई जिमच्या आवारात राजर्षी छ. शाहू महाराज अभिवादान करण्यात आले. राजर्षी शाहू महाराजांनी लाल मातीच्या कुस्तीला राजाश्रय दिला. तालीम आणि आखाडे बांधले. …
Read More »राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना निपाणीमध्ये अभिवादन
मान्यवरांची उपस्थिती : संभाजी राजे चौकात कार्यक्रम निपाणी (वार्ता) : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्त शुक्रवारी (ता.६) येथील धर्मवीर संभाजीराजे चौकात अभिवादन करण्यात आले. प्रारंभी माजी आमदार काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी व मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आली. यावेळी १०० सेकंद स्तब्धता पाळून …
Read More »निपाणीत शिवकालीन मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक
‘मध्यवर्ती’तर्फे आयोजन: निपाणीकरांच्या डोळ्याचे फिटले पारणे निपाणी (वार्ता) : येथे शिवजयंती महोत्सवानिमित्त येथील मध्यवर्ती श्री शिवाजी तरुण मंडळातर्फे कोल्हापूर येथील सिद्धिविनायक शिवकालीन मर्दानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विविध प्रात्यक्षिके सादर केल्याने निपाणीकर यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. शिवकालीन मर्दानी प्रेक्षकांमध्ये लाठी फिरवणे, तलवारबाजी, जाळी फेक, शिवकालीन ढालीच्या …
Read More »मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाकडून पोलीस आयुक्त बोरलिंगय्यांचे आभार
बेळगाव : बेळगाव शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शिवप्रेमींवर कोणताही दबाव न घालता उत्साहाने शांततेत पार पाडण्यासाठी मायक्रो प्लॅनिंग करून परिश्रम घेतल्याबद्दल मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावतर्फे पोलीस प्रशासन विशेष करून पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांचे आभार मानून अभिनंदन करण्यात आले. मध्यवर्ती सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावचे …
Read More »हिडकल जलाशयातून घटप्रभावरील कालव्याला पाणी पुरवठा करण्याची मागणी
बेळगाव : उन्हाच्या झळा दिवसेंदिवस वाढत चालल्या असून पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत चालली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि जनावरांना बसत असून गोकाक आणि मूडलागी परिसरातील शेतकरी या समस्येमुळे अडचणीत आहेत. हिडकल जलाशयातून घटप्रभा कालव्यात पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभाग मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयाला घेराव घातला. मानुष्यासह …
Read More »बेळगावमध्ये विनाअनुदानित शाळा-महाविद्यालय कर्मचारी-शिक्षकांचे आंदोलन
बेळगाव : १९९५ नंतर प्रारंभ झालेल्या विना अनुदानित शाळा महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाच्या वतीने शाळा-महाविद्यालयांना अनुदान मिळावे तसेच कर्मचारी वेतन देण्यात यावे, या मागणीसाठी बेळगाव शहरात राज्यस्तरीय धरणे आंदोलन हाती घेण्यात आले. १९९५ नंतर स्थापन झालेल्या शाळा महाविद्यालयातील प्रशासकीय मंडळाला तसेच कर्मचाऱ्यांना अनुदान आणि वेतन देण्याच्या मागणीसाठी आज बेळगावमध्ये आंदोलन हाती …
Read More »बेळगावच्या महिला ॲथलेटची सुवर्णपदकाची कमाई
बेळगाव : नुकत्याच दिल्ली येथे पार पडलेल्या आजादी का अमृत महोत्सव यांच्यावतीने खेलो इंडिया मास्टर असोसिएशन ॲथलेटिक्स स्पर्धेचे बेळगावच्या महिला ॲथलेटने सुवर्ण पदकांची कमाई केली आहे. नुकत्याच दिल्ली येथे 30 एप्रिल पासून ते 3 मे पर्यंत मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बेळगावच्या कन्येने गरुड झेप घेत तीन …
Read More »ना. सुभाष देसाई यांच्याहस्ते उद्या प्रबोधन कौशल्य निकेतनचे उद्घाटन होणार
माणगांव (नरेश पाटील) : महाराष्ट्र राज्य उद्योगमंत्री ना. सुभास देसाई यांच्या हस्ते शनिवारी दि. ७ मे रोजी सायंकाळी ५ वा. जे. बी. सावंत एज्युकेशन सोसायटी बामणोली रोड माणगांव येथे प्रबोधन कौशल्य निकेतन पहिला टप्पाचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला ना. सुभाष देसाई यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती …
Read More »गर्लगुंजीत लक्ष्मी, मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा व महाप्रसाद उत्साहात
खानापूर (प्रतिनिधी) : गर्लगुंजीत (ता. खानापूर) गावच्या लक्ष्मी आणि मऱ्याम्मा मंदिराचा जीर्णोद्धार करून नव्याने उभारण्यात आलेल्या मंदिरात नविन लक्ष्मी आणि मऱ्याम्मा देवीच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा शुक्रवारी दि. ६ रोजी करण्यात आला. यानिमित्ताने मंगळवारी व बुधवारी गावातून मुर्तीची मिरवणूक वाद्याच्या तालावर व भंडाऱ्याची उधळण करत करण्यात आली. गुरूवारी नुतन मंदिराची वास्तूशांती करण्यात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta