जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर बेळगाव : दिव्यांग पेन्शन वाढीसह दिव्यांगांच्या मुलांना मोफत शिक्षणासह शासकीय अनुदान देण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव शहर व जिल्ह्यातील दिव्यांगांनी आज बुधवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. प्रसारमाध्यमांशी बोलताना उमेश रोट्टी म्हणाले की, …
Read More »धर्मवीर संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वाकडे
बेळगाव : बेळगावमधील महत्वपूर्ण धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सदरेच्या मुख्य चौथऱ्यावर करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. हे काम तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि उत्तर विभागाचे आमदार अनिल बेनके यांच्याकडून कामाची व्यवस्था बघण्यात येत आहे. बेळगावात अनेक चौक आहेत त्यापैकी धर्मवीर संभाजी चौक हा …
Read More »वेणूग्राम सायकलिंग क्लबचा वर्धापन दिन साजरा
बेळगाव : उत्तर कर्नाटकातील सर्वात मोठा फिटनेस क्लब असलेल्या वेणूग्राम सायकलिंग क्लब बेळगावचा 5 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बेळगावच्या वेणुग्राम सायकलिंग क्लबतर्फे आठवडाभर गटागटाने सायकलिंग, धावणे आणि जलतरणाचे उपक्रम राबविले जातात. ग्रुपच्या नुकत्याच साजरा झालेल्या पाचव्या वर्धापन दिन समारंभास 183 नोंदणीकृत सदस्यांपैकी सुमारे 135 जण …
Read More »२८ नोव्हेंबर रोजी गंदिगवाडात पंचमसाली आरक्षणासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन
खानापूर (प्रतिनिधी) : पंचमसाली समाजाला २ ए वर्ग आरक्षण द्यावे. या मागणीसाठी सरकारकडे सतत मागणी होत असुन अद्याप सरकारने लक्ष दिले नाही. यासाठी येत्या १२ डिसेंबर रोजी बंगळूर येथे विद्यानसौधला घेराव घालून सरकारला जाब विचारण्यासाठी लिंगायत समाजाचे सर्वत्र मेळावे सुरू आहे. तेव्हा गंदिगवाडात (ता. खानापूर) येथे येत्या २८ नोव्हेंबर …
Read More »यरनाळ येथे ग्रंथालय सप्ताह दिन साजरा
निपाणी (वार्ता) : यरनाळ येथे ग्रामपंचायत डिजिटल ग्रंथालय आणि माहिती केंद्र यरनाळ यांच्यामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या साठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धेमध्ये कन्नड माध्यम व मराठी माध्यमातील सहावी व सातवी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पुष्पहार …
Read More »ग्रीन एनर्जी कॉरिडॉर : नवीन पॉवर लाईन्स राज्यहिताला ठरतील पूरक आणि पोषक
बेळगाव / धारवाड : बेळगाव आणि धारवाड जिल्ह्यांमध्ये टाकण्यात येणार्या नवीन पॉवर लाईन्समुळे कर्नाटकात अक्षय ऊर्जा प्रसारित करण्यात मदत होईल आणि उत्पादित ऊर्जा दक्षिण आणि पश्चिमेकडील ग्रीड्समधून कार्यक्षमतेने बाहेर काढण्यास मदत होईल. इतकेच नाही तर सौर आणि पवन ऊर्जा निर्मितीमध्ये कर्नाटकाचे स्थान देशात बळकट होईल. अशा हालचालीमध्ये नरेंद्र-झेल्डेम ट्रान्समिशन …
Read More »अनधिकृत लाल पिवळ्या झेंड्या विरोधी आंदोलन प्रकरणी विशेष सुनावणी
बेळगाव : अनधिकृत लाल-पिवळ्या झेंड्याच्या विरोधी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग व कर्नाटकाचे जनसंपर्क खात्याशी पत्रव्यवहार करून अनधिकृत लाल-पिवळ्या व त्यामुळे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान निदर्शनास आणून देण्यात आला होता. या प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करून त्यावर कारवाई करून तो झेंडा हटवण्यास सांगण्यात आले होते. इतका राष्ट्रध्वजाचा …
Read More »राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आपले विधान मागे घ्यावे
माजी आमदार काकासाहेब पाटील : निपाणी निषेध निपाणी (वार्ता) : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले आहे. त्याचे निपाणी सीमाभागात तीव्र पडसाद उमटले आहेत. या विधानाचा निषेध म्हणून निपाणी परिसरातील शिवप्रेमींनी बुधवारी (ता. २३) येथील बस स्थानका जवळील …
Read More »क्षुल्लक कारणावरून युवकावर प्राणघातक हल्ला
बेळगाव : कचरा टाकताना दुचाकीला हात लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून युवकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना बेळगावातील भाग्यनगर येथे घडली आहे. भाग्यनगर पहिला क्रॉस येथील दत्त मंदिराजवळ काल, मंगळवारी रात्री आशिष शेणवी कचरा टाकण्यासाठी जात होता. यावेळी चुकून त्याचा हात रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीला लागला. यावरून दुचाकीस्वाराने त्याच्याशी भांडण करून …
Read More »महाराष्ट्रातील एकही गाव कुठे जाणार नाही; बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडची गावं घेण्याचा आमचा प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
मुंबई : “महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाऊ देणार नाही. पण सर्वोच्च न्यायालयात लढून बेळगाव, कारवार, निपाणीसह तिकडे असलेले गावं घेण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सांगलीच्या जतमधील गावांनी कर्नाटकात जाण्याचा ठराव आता केलेला नाही तर तो 2012 मधला आहे. आपण त्या गावांना …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta