Tuesday , December 16 2025
Breaking News

Belgaum Varta

दुचाकी चोरट्यांना टिळकवाडी पोलिसांकडून अटक

बेळगाव : टिळकवाडी येथील कांता अपार्टमेंटच्या वाचमनने दुचाकी चोरी झाल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राघवेंद्र हवालदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तपास करून दोन दुचाकी चोरट्यांना ताब्यात घेतले व त्यांच्याकडून 1 लाख 50 हजार रुपये किमतीच्या 8 दुचाकी जप्त केल्या असून या …

Read More »

भारतीय नौदल वाद्यवृंदाची संगीत मैफिल रविवारी

बेळगाव : माजी नौदल कर्मचारी संघटना बेळगाव यांच्यातर्फे येत्या रविवार दि. 1 मे 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता भारतीय नौदल वाद्यवृंदाच्या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील टिळकवाडी येथील आरपीडी कॉलेज मैदानावर भारतीय नौदल वाद्यवृंदच्या या संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मैफलीच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

आमदारांकडून सदाशिवनगर स्मशानभूमीची पाहणी

बेळगाव : बेळगाव महापालिकेकडून अखेर सदाशिनगर स्मशानभूमीतील दाहिनीवरील शेडची दुरूस्ती करून नवे पत्रे घालण्यात आले आहेत. याची माहिती मिळताच आमदार ॲड. अनिल बेनके यांनी शेडला भेट देऊन कामाची पाहणी केली. सदाशिनगर स्मशानभूमीतील दाहिनीवरील शेडचे पत्रे खराब झाल्याने त्याचे अवशेष लोंबकळत होते. त्यामुळे अंत्यविधीसाठी जाणाऱ्या मृतांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला होता. …

Read More »

अनोळखी मुलगी नातेवाईकांकडे सुपूर्द

बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकनजीक भटकत असलेल्या एका अनोळखी मुलीला सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या मदतीने तिच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केल्याची घटना आज सकाळी घडली. बेळगाव शहरातील मध्यवर्ती बस स्थानकनजीक आज आज गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास एक मुलगी भांबावलेल्या अवस्थेत भटकत असल्याचे अभय बेळगुंदकर, गुरुराज बनाजी, सुधीर शहापूरकर आणि प्रशांत भागोजी …

Read More »

महात्मा गांधींचे स्वप्न पंतप्रधान मोदी साकारणार : मंत्री गोविंद कारजोळ

बेळगाव : भारत हा देश खेड्यांचा देश आहे, देशातील खेड्यांचा विकास व्हायला हवा. तेथील गृहोद्योग वाढले पाहिजेत, ग्रामीण भागात राहणाऱ्या कारागिर आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले पाहिजे हे महात्मा गांधींचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्ण करत आहेत, असे जलसंसाधनमंत्री गोविंद कारजोळ यांनी सांगितले. बेळगाव येथील काँग्रेस विहीर, वीरसौधच्या प्रांगणात गुरुवारी स्वातंत्र्याच्या …

Read More »

भीमा कोरेगावप्रकरणी शरद पवारांना समन्स; चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

मुंबई : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांना समन्स बजावलं आहे. त्यांना आयोगानं पाठवलेलं हे तिसरं समन्स आहे. यापूर्वी दोन वेळेस वैयक्तिक करणांमुळं पवार या सुनावणीला हजर राहू शकले नव्हते. येत्या ५ आणि ६ मे रोजी मुंबईमध्ये भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी चौकशी आयोगाची सुनावणी …

Read More »

धोतर शीटमध्ये अडकल्याने संभाजी भिडे सायकलवरुन कोसळले; खुब्याला गंभीर दुखापत

सांगली : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांचा बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. ते सांगलीतील गणपती मंदिरमध्ये सायकलवरून दर्शनासाठी निघाले होते. यावेळी हा अपघात झाला. याबाबत अधिक माहिती अशी की, संभाजी भिडे हे गणपती मंदिराकडे सायकलवरुन निघाले होते. ते गणपती मंदिरजवळ पोहोचल्यानंतर सायकलवरुन उतरत होते. त्यावेळी त्यांचे …

Read More »

चंदगड काँग्रेसचा केंद्र सरकारच्या चूकीच्या धोरणाविरोधात चंदगड तहसिलवर भोंगा मोर्चा

तेऊरवाडी (एस. के. पाटील) : केंद्रातील भाजप सरकारच्या चूकीच्या धोरणामुळे वाढती महागाई, बेरोजगारी यामुळे त्रस्त जनतेचा आक्रोश व जनतेच्या मनातील भावना विविध माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोचवण्यासाठी चंदगड तालूका काँग्रेसच्या वतीने चंदगड तहसिल कार्यालयापर्यंत जुमला (भोंगा) आंदोलन करून तहसिलदार विनोद रणवरे यांना निवेदन दिले. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले व जिल्हा …

Read More »

शिवजयंती उत्साहात, शांततेत साजरी करा : पोलीस आयुक्त बोरलिंगय्या

बेळगाव : शिवजयंती उत्सव उत्साह आणि शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची विनंती बेळगांवचे पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी केले आहे. बेळगावातील पोलीस समुदाय भवनामध्ये आज शिवजयंती उत्सवाची पूर्वतयारीची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत सर्व शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी, डीसीपी रवींद्र गडादि, डीसीपी पीव्ही स्नेहा आदी उपस्थित होते. …

Read More »

नवी गल्ली शहापूर येथे एकोप्यात इफ्तार पार्टीचे आयोजन

बेळगाव : शहापूर नवी गल्ली येथे सर्वधर्म समभावाचे संदेश देत रमजान निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर नवी गल्ली येथील मशिदी समोर या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर आणि नगरसेवक रवी साळुंके, त्यांच्यासह निमंत्रित पाहण्या म्हणून माजी नगरसेवक नेताजी जाधव, …

Read More »