Monday , September 21 2026
Breaking News

ढोकेगाळी शाळेला खानापूरच्या आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांची भेट

Spread the love

खानापूर : खानापूर तालुक्यातील ढोकेगाळी येथील मराठी शाळची इमारत कोसळली होती. याची माहिती अंजलीताईना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांशी भेट घेऊन चर्चा केली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व ग्रामस्थांच्या समस्या तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली.
शाळेची पाहणी करून शाळेची कौले काढून मोडकळीस आलेल्या छताची डागडुजी करून नवीन पत्रे घालण्यासाठी 4 लाख मंजूर केले तसेच शाळेच्या नवीन खोलीच्या मंजुरीचा प्रस्ताव सरकार दरबारी पाठविला असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात आचारसंहिता लागू आहे. 17 जूनला आचारसंहिता संपणार त्यानंतर त्वरित पत्रे घालण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या. संबंधित कामाबद्दल पीडिओना देखील सुचना करण्यात आल्या आहेत.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *