Monday , December 15 2025
Breaking News

Belgaum Varta

संकेश्वरात मराठा वधू-वर मेळाव्याला “मास्क’ बंधनकारक….

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरात प्रथमच येथील रुक्मिणी गार्डनमध्ये येत्या रविवार दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजता भव्य मराठा वधू-वर परिचय महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मेळाव्याचे आयोजन शुभकार्य वधुवर सुचक केंद्र, न्यायनिवाडा लोकनेता फौंडेशनच्यावतीने करण्यात आले आहे. वधुवर महामेळाव्याला उपस्थित राहणाऱ्यांना मास्क बंधनकारक राहणार आहे. …

Read More »

शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीसाठी पोलीस आयुक्तांना निमंत्रण

बेळगाव : बेळगावची ऐतिहासिक शतकपूर्ती शिवजयंती आणि शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी आज मंगळवारी शहराचे पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांची भेट घेऊन चर्चा केली तसेच मिरवणूक उद्घाटनासाठी त्यांना निमंत्रीत केले. शहरात येत्या 2 ते 4 मे या कालावधीत साजरा …

Read More »

श्री तुळजा भवानी महिला मंडळाचे उद्घाटन थाटात

बेळगाव : शहरातील बापट गल्ली येथील नवहिंद युवक मंडळाच्या श्री तुळजा भवानी महिला मंडळाचा उद्घाटन समारंभ काल रविवारी थाटात पार पडला. बापट गल्ली येथे आयोजित सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके उपस्थित होते. प्रारंभी स्वागत आणि प्रास्ताविक झाल्यानंतर आमदार ॲड. बेनके यांच्या हस्ते महिला मंडळाचे …

Read More »

बेळगावात महिला सुरक्षेबाबत जनजागृतीसाठी बाईक रॅलीचे स्वागत

बेळगाव : महिलांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने बेंगळूरहून काढण्यात आलेल्या बाईक रॅलीचे मंगळवारी बेळगावात रोटरी क्लब ऑफ बेळगाव दर्पणच्यावतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बंगळूर मालगुडी आणि रोटरी ई-क्लब ऑफ बंगळूर सखी यांच्यातर्फे 30 दिवसात 30 जिल्ह्यात 3500 किमी अंतराची बाईक रॅली काढण्यात आली आहे. महिला सुरक्षेबाबत जनजागृती …

Read More »

आमटे येथे छ. शिवाजी महाराज स्मारकाचे काॅलम भरणी संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : आमटे (ता. खानापूर) येथे नविन बांधण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्मारकाचा काॅलम भरणी कार्यक्रम रविवारी दि. २४ रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे जांबोटी विभाग माजी अध्यक्ष व ज्येष्ठ नागरिक महादेव गावकर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात भाजपचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार संजय पाटील, भाजपचे नेते माजी आमदार …

Read More »

कुस्ती शौकिनांसाठी आनंदाची बातमी : कोल्हापूरात होणार राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा…

कोल्हापूर : राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षानिमित्त कोल्हापूरच्या खासबाग मैदानात यावर्षी नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय स्तरावरील ‘मातीतील कुस्ती स्पर्धां’चे आयोजन करण्यात येणार आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे व भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार श्री. बृजभूषण शरण सिंह यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. काही दिवसांपूर्वी याच बाबतीत खासदार छत्रपती …

Read More »

शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती

बेळगाव : बेळगावात सेवा बजावुन लोकांची मने जिंकलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शंकर मारिहाळ यांना एसपी पदी पदोन्नती मिळाली आहे. हुबळी येथील हेस्कॉम जागृती दलाच्या एसपी पदी त्यांची पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे. होय, शंकर मारिहाळ यांनी यापूर्वी बेळगावात मार्केट पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर, डीवायएसपी म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे. सध्या ते …

Read More »

बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघ पदाधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व हसन मुश्रीफ यांची भेट

मुंबई : बेळगांव जिल्ह्यातील मराठी पत्रकारांच्या समस्यांबाबत बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापुरकर तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी सोमवारी मंत्रालय, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, चंदगडचे आमदार राजेश पाटील, राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून चर्चा केली. यावेळी बोलताना ना. अजितदादा पवार म्हणाले की, …

Read More »

येळ्ळूर येथे अज्ञाताचा खून करून मृतदेह टाकला

बेळगाव : बेळगाव तालुक्यातील येळ्ळूर येथे अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्याचा खून झाला असावा अशी शंका आहे. खून झालेल्या अवस्थेतील अज्ञाताचा मृतदेह आढळून आल्याने येळ्ळूर गावात एकच खळबळ उडाली आहे. कोणीतरी त्याचा खून करून मृतदेह गावात टाकून दिला अशी चर्चा आहे. काल रात्री ही घटना घडल्याचा कयास आहे. …

Read More »

कमतनूर वेसची डागडुजी कधी?

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरातील कमतनूर वेसची डागडुजी कधी करणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. संकेश्वरातील आदिलशाही इतिहासाची आठवण करुन देणाऱ्या कमानी लूप्त पावल्या आहेत. संकेश्वरातील दोन वेसींचे महत्व कायम स्वरुपी टिकवून ठेवण्याचे कार्य केले जात आहे. संकेश्वरातील प्रमुख कमतनूर वेसीचा ढाचा निखळून पडण्याच्या स्थितीत दिसतो आहे. कमतनूर वेसीवर संकेश्वरचे …

Read More »