बेळगाव : उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा प्रतिवर्षी गौरव करून प्रोत्साहन देणारी ग्रामीण भागातील ही सोसायटी अभिनंदनाला पात्र आहे, असे प्रतिपादन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे मनोज पावशे यांनी सुळगा (हिं) येथील बेळगाव तालुका विविध कार्यकारी सहकारी संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आयोजिण्यात आला होता याप्रसंगी त्यांनी आपले मत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी संघाचे …
Read More »बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान!
बेळगाव : नुकताच पडलेल्या मुसळधार पावसामुळे बळ्ळारी नाला परिसरातील भातपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी जून महिन्यात पेरणी केली होती. भातपिक जोमाने आले होते मात्र बळ्ळारी नाल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण भातपिक नष्ट झाले आहे. तसेच लावणीसाठी टाकलेली तरू देखील कुजलेले आहेत. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र दुबार …
Read More »मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन
कोल्हापूर (जिमाका) : आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे काल निधन झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार श्री. पाटील यांच्या संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट देवून त्यांचे व कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल …
Read More »सर्किट बेंच स्थापनेसाठी पाठपुरावा करू : एकनाथ शिंदे
कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच स्थापन करण्यासंदर्भात आपण लवकरच मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे बोलताना स्पष्ट केले. कोल्हापूर सर्किट बेंचबाबत आपल्याला परिपूर्ण माहिती आहे, सर्किट बेंच स्थापनेसाठी आपण पाठपुरावा करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे …
Read More »सिद्धरामय्या, डीकेशींची मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने हि स्वप्नेच राहणार : मंत्री उमेश कत्ती
बेळगाव : काँग्रेसमध्ये खुर्चीवरून सुरु असलेल्या घमासान वरून विजापूरमध्ये मंत्री उमेश कत्ती यांनी प्रतिक्रिया देत काँग्रेसला टोला लगावलाय. काँग्रेसमध्ये खुर्चीवरून अंतर्गत मतभेद सुरु आहेत. मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच आतापासूनच सुरु आहे. मात्र राज्यात पुन्हा काँग्रेस सत्तेवर येणार नाही, असा टोला उमेश कत्ती यांनी लगावलाय. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार हे कधीच …
Read More »स्वातंत्र्यानंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकला नाही! : आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांचा टोला
बेळगाव : स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आरएसएस कार्यालयावर तिरंगा फडकलेला पाहिला नाही, असा टोला आम लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप सरकारच्या हर घर तिरंगा या उपक्रमावर लगावला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजप सरकारने आखलेल्या हर घर तिरंगा या मोहिमेसंदर्भात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भाजप आणि आर एसेसवर निशाणा साधलाय. स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली. …
Read More »इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड लांबवली
इचलकरंजी : इचलकरंजीत धूम स्टाईलने महिलेच्या हातातील ४ लाखांची रोकड असलेली पिशवी मोटारसायकल वरून आलेल्या चोरट्यांनी लांबवली. हा प्रकार आज (दि.२५) हवामहल बंगला रोडवर घडला. शिवाजीनगर पोलिसांनी चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, संगीता सुरेश टाकवडे (रा. तारदाळ) जाणता राजा नावाचा बचत गट चालवतात. या बचत …
Read More »लोकसभेत महागाईविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांवर निलंबनाची कारवाई
नवी दिल्ली : महागाईविरोधात सभागृहात फलक घेऊन निदर्शने केल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा करण्याचा इशारा दिला होता. आंदोलन करायचं असेल तर त्यांनी सभागृहाच्या बाहेर आंदोलन करावं, असंही ते म्हणाले होते. पण काँग्रेसच्या खासदारांनी महागाईविरोधातील आपलं …
Read More »शांतिनिकेतन सीबीएसई दहावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या ऋतुजा लक्ष्मण गुरव हिचा सत्कार
खानापूर (प्रतिनिधी) : तोपिनकट्टी (ता.खानापूर) गावची कन्या श्री महालक्ष्मी ग्रुप संचालित शांतिनिकेतन पब्लिक स्कूलच्या सीबीएसई दहावीची विद्यार्थीनी ऋतुजा लक्ष्मण गुरव हिने सीबीएसई दहावीच्या परीक्षेत ९६.२ गुण घेऊन शांतिनिकेतन पब्लिक स्कूलमध्ये प्रथम येण्याचा मान मिळविला. तसेच शांतिनिकेतन पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा निकाल यंदाही १००टक्के लागला आहे. सलग आठव्या वर्षीही १०० टक्के …
Read More »निपाणी तालुक्यातील शुद्ध पाणी पुरवठा केंद्रांची अवस्था गंभीर
राजेंद्र वड्डर : ६६ पैकी निम्मे बंदच निपाणी (वार्ता) : तालुक्यात सुमारे ६६ शुद्ध पाणी पुरवठा केंद्र असून त्यापैकी निम्म्यापेक्षा जास्त केंद्रांची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांना कमी खर्चात मिळणाऱ्या पाणी पुरवठा संकल्पाला अंतिम दिवस आले असून याकडे लोकप्रतिनिधींचे संपूर्ण दुर्लक्ष जोग असल्याचा आरोप भोज …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta