चंदगड (प्रतिनिधी) : नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन व हेल्थ अँड नेचर डेव्हलोपमेंट सोसायटी बेळगाव यांच्यावतीने नुकताच आंतरराज्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. यामध्ये शिनोळी बुद्रुक तालुका चंदगड येथील सरपंच नितीन नारायण पाटील यांना समाजसेवेचा आंतरराज्य पुरस्काराची घोषणा करण्यात आली. कर्नाटक महाराष्ट्र गोवा या तीन राज्यातून कार्यकर्तृत्व सिद्ध केलेल्या विशेष व्यक्तींना प्रत्येक …
Read More »येळ्ळुर येथे गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा मृत्यू
बेळगाव (प्रतिनिधी) : येळ्ळुर येथे शेतकर्याच्या गोठ्याला आग लागून दोन म्हशींचा होरपळून मृत्यु झाला. तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. यामध्ये काही शेती साहित्य सुद्धा जळून खाक झाले आहे. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.शेतकरी मुकुंद लक्ष्मण मुरकुटे यांनी दिवसभर …
Read More »सीमाप्रश्नी लक्ष वेधण्यासाठी स्वातंत्र्यदिनी कराड तालुक्यातील तरुण-तरुणींची पंतप्रधानांना पत्रे
कराड : बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा याकरिता गेल्या 65 वर्षांपासून लढा सुरु आहे. अनेकांनी हा प्रश्न सुटावा याकरिता आपले जीवन समर्पित केले. काहींनी तर आपले बलिदान दिले. सामान्य माराठी माणसापासून ते विविध नेत्यांनी, पत्रकारांनी, कवी-लेखकांनी, कलाकारांनी आपआपल्यापरीने हा प्रश्न सुटावा याकरिता महत्वपूर्ण योगदान दिले. असा हा …
Read More »मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा
बेळगाव : मराठा सेवा संघाचा तिसरा वर्धापन दिन मराठा सभागृह गणेश कॉलनी संभाजी नगर येथे नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन स्वराज्य फर्निचरचे मालक हिरामनी शिंदे यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन मोहन बालाजी पाटील (मुख्याध्यापक मराठी शाळा येळ्ळूरवाडी) यांनी केले तर माँ. जिजाऊ प्रतिमा पूजन सामाजिक कार्यकर्ते महादेव …
Read More »स्वातंत्र्य दिनापूर्वी अनधिकृत झेंडे हटवा
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने निवेदन सादर बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापूर्वी अनधिकृत झेंडे हटवा यासाठी बेळगाव जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. नमूद विषयाप्रमाणे बेळगावमधील महानगरपालिका, प्रादेशिक आयुक्त कार्यालय, हेस्कॉम कार्यालय, रेल्वे स्थानक आणि इतर सरकारी ठिकाणी अजून हि अनधिकृत झेंडे फडकविण्यात आले आहेत, हे …
Read More »सीमाप्रश्नी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा : पुंडलिक पाटील
करंबळ ग्रामस्थांकडून पत्रांच्या मोहिमेला पाठिंबा खानापूर (वार्ता) : सीमाप्रश्न सुटावा यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने करण्यात आलेली आहेत. मात्र अजूनही लढ्याला यश आलेले नाही. त्यामुळे सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, यासाठी पाठविण्यात आलेल्या पत्रांची मोदी यांनी दखल घ्यावी आणि मराठी भाषिकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन समिती नेते पुंडलिक …
Read More »’एसटी’ला आता विषाणूरोधक कोटिंग!
परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे …
Read More »मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध
मंत्री शशिकला जोल्ले : कोगनोळी येथे आहार किटचे वितरण कोगनोळी : 2008 साली मी या मतदारसंघात आले. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंघात संकट आले व मी आले नाही असे कधी झाले नाही. परवा आलो नाही याच्या पाठीमागे माझी वैद्यकीय कारण होते. त्यामुळे मी येऊ शकलो नाही याचा अर्थ विरोधकांनी वेगळा काढला. विरोधकांच्या …
Read More »फांद्या छाटणीच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची तोड
हेस्कॉमची कुर्हाड : छाटणी अशास्त्रीय असल्याचा आरोप निपाणी : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर हेस्कॉमकडून शहरातील वीजतारांना अडथळा ठरणार्या उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केली जाते. मात्र निपाणी शहर आणि उपनगरात मजुरांकडून अशास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटल्या जात आहेत. फांद्या नसल्याने झाडे धोकादायक होऊन वादळवार्यात उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे …
Read More »चंदगड भूषण पुरस्कार प्रांताधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट समजला जाणारा चंदगड भूषण पुरस्कार 2020-21 सालाकरिता गडहिंग्लज येथील उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी रोजगार हमी मंत्री भरमू अण्णा पाटील होते. रोखठोक आवाजाचे संपादक व निवड कमिटीचे अध्यक्ष अॅड. संतोष मळवीकरसह कमिटीने नियोजन केले. यावेळी प्राध्यापक सुनील …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta