खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने कर्नाटक राज्याचे २३ वे नुतन मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचे बेगळूर येथे जाऊन अभिनंदन केले. व खानापूर तालुक्यातील विकास कामाबद्दल निवेदन सादर केले.मुख्यमंत्री बसराज बोम्माई यांनी नुकताच शपथविधी घेतल्यानंतर खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बेंगळुरूला जाऊन मुखमंत्री बसवराज बोम्माई व मुरगेश निराणी यांना पुष्पगुच्छ देऊन …
Read More »बेळगावसह सीमेवरील जिल्ह्यात शनिवार आणि रविवार वीकेंड कर्फ्यूची घोषणा
बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यातील कोरोना संकट गंभीर होताना दिसत आहे. कोरोनानं हळूहळू सर्वच शहरांमध्ये हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. कोरोनानं डोकं वर काढलं आहे. कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन संपूर्ण राज्यात नाईट कर्फ्यू लागू (रात्री 9 ते सकाळी 5) करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळेत कलम 144 लागू राहील.तसेच सीमेवरील …
Read More »जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. दत्तप्रसाद गिझरे यांचे व्याख्यान
बेळगाव (वार्ता) : दि.१ ऑगस्टते ७ ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून आचरला जातो. यानिमित्ताने गिझरे मेटर्निटी हॉस्पिटलतर्फे बेळगावचे सुप्रसिद्ध प्रसूतीतज्ञ डॉ. दत्तप्रसाद गिझरे-मंजुषा गिझरे यांचे स्तनपान आणि मातेच्या दुधाचे महत्व याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. आई व बाळ यांच्यामधील स्तनपानाची प्रक्रिया कशी महत्वाची असते याविषयी स्लाईड शोद्वारे डॉ. …
Read More »तेऊरवाडीच्या वैभव पाटीलची जर्मनीला झेप
तेऊरवाडी (वार्ताहर) : सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या तेऊरवाडीतील (ता. चंदगड) येथील वैभव जनार्दन पाटील यांची जर्मनीतील सिमेन्स हैत्थनेस कंपनीमध्ये कॉम्प्यूटर इंजिनियर म्हणून निवड झाली. त्यामुळे तेऊरवाडीचे नाव सातासमुद्र पार पोहचले. येथील निवृत्त सहाय्यक फौजदार जे. एम. पाटील यांचा वैभव हा मुलगा कॉम्प्युटर इंजिनियर आहे. गेल्या अनेक वर्षापासून वैभव बंगलोरला …
Read More »चंदगड तालुका शिक्षक परिषदेने शिक्षक, शेतकरी व व्यापारी यांच्या प्रश्नांना फोडली वाचा
तेऊरवाडी (एस. के. पाटील) : माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी, पालक व पुरग्रस्त शेतकरी, व्यापारी यांच्या विविध मागण्यांचे निवेदन आज महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद मार्फत चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे देण्यात आले. कोरोना काळात मृत्यूमुखी पावलेल्या शिक्षकांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याविषयी सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा. कोरोनाचे सर्व नियमांना अधिन राहून …
Read More »शिवसेनेतर्फे कोगनोळीत महामार्गावर रास्तारोको
आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …
Read More »मुख्यमंत्री, आमदारांना पत्रे; युवा समितीकडून मोहिमेत सहभागी होण्याची विनंती
बेळगाव (वार्ता) : सीमाप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा आणि सीमावासीयांना न्याय मिळवून द्यावा यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे ऑगस्ट क्रांती दिनी पत्र पाठवून लक्ष वेधण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या मोहीमेमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर मंत्र्यांनी सहभागी व्हावे यासाठी युवा समितीतर्फे मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्र राज्यातील खासदार आणि …
Read More »सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आधार!
बेळगाव (वार्ता) : हनमन्नावर गल्ली अनगोळ येथे गेल्या दोन-तीन वर्षापासून ३०-३५ वर्षीय अनोळखी महिला फिरत होती. तिला कुटुंबाचा आधार नव्हता. तेथील नागरिक तिला अन्न पाणी देऊन तिची भूक भागवत होते. पण हल्ली तिचे मानसिक संतुलन खूपच बिघडल्याने ती तेथील नागरिकांना शिवीगाळ करत होती व नग्नावस्थेत फिरत होती. येथील नागरिकांना, महिला …
Read More »तालुक्याच्या प्रत्येक ग्रा. पं.तीत होणार कचरा डेपोचे आयोजन
खानापूर (सुहास पाटील याजकडून) : खानापूर तालुक्यात एकूण ५१ ग्राम पंचायती कार्यरत आहेत. त्यापैकी ३८ ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील ३ एकर जमिनीत हा कचरा डेपोचे आयोजन करण्यात येणार आहे.यापैकी नंदगड ग्राम पंचायतीने कचरा डेपो कामाचा शुभारंभ केला असून याठिकाणच्या कचरा डेपोत गावातील प्लॅस्टिक पिशव्या, प्लॅस्टिक बाॅटल, कचरा असा वेगळा केला जातो. …
Read More »सेवानिवृत्तीनिमित्त बुवाजी व गुरव यांचा सत्कार
बेळगाव : हलशी येथील छत्रपती शिवाजी विद्या मंदिर हायस्कुल येथील मुख्याध्यापक बी. आर. बुवाजी ३६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तर बडकू गुरव हे ४४ वर्षांच्या प्रदीप सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. त्याबाबत त्यांचा शाळा सुधारणा कमिटी व मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्यावतीने बुधवारी बुवाजी व गुरव यांचा सत्कार करण्यात आला.शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta