Saturday , December 13 2025
Breaking News

Belgaum Varta

जिल्ह्याच्या विभाजनासाठी पुढाकार घेणारच : मंत्री उमेश कत्ती

बेळगाव : चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल एसी ऑफिस हे आम्ही किंवा तुम्ही निर्माण केले नाही. यापूर्वी ब्रिटिशांनी तिन्ही बाजूला एसी ऑफिसची निर्मिती केली आहे. याचप्रकारे चिकोडी, बेळगाव, बैलहोंगल अशा तीन जिल्ह्यांचे विभाजन व्हावे, यासाठी पुढाकार घेणारच असे उमेश कत्ती प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. ते पुढे म्हणाले, बेळगाव जिल्हा हा खूप मोठा जिल्हा …

Read More »

वडेबैलात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : वडेबैलात (ता. खानापूर) येथे सालाबादप्रमाणे यंदा ही रविवारी दि. 10 रोजी श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी रविवार पहाटे हभप गंगाराम नांदुरकर, यडोगा यांच्या अधिष्ठानाखाली सोहळ्याला प्रारंभ होऊन सकाळी पोथी स्थापना, पुजा, आरती, सामुहिक भजन होऊन यावेळी ज्ञानेश्वरीचे वाचन करण्यात आले. दुपारी तुकारामांच्या गाथावरील भजन, प्रवचन, …

Read More »

आयसीएलचा बेळगावात प्रवेश, आता कुंदा यूएसएला 4 दिवसात पोहचणार

बेळगाव :आयसीएल इंटिग्रेटेड कुरिअर्स अँड लॉजिस्टिकने बेळगावमध्ये नेटवर्क विस्ताराची घोषणा करित आयएक्सजी लॉजिस्टिकची बेळगाव क्षेत्रासाठी प्रादेशिक व्यवसाय भागीदार म्हणून नियुक्ती केली आहे. घरगुती उत्पादने, वैयक्तिक पॅकेजेस आणि जगभरातील विविध स्थानांवर B2B शिपमेंटची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आयसीएल कार्यरत आहे. आयसीएल एक्सप्रेस डोअर डिलिव्हरी, एअर आणि ओशन फ्रेट फॉरवर्डिंग, डीजी गुड्स …

Read More »

जायंट्स संघटनेचे कार्य प्रेरणादायी : आप्पासाहेब गुरव

फेडकॉन राज्यस्तरीय परिषद बेळगावात संपन्न बेळगाव : ’जायंट्स मेन ही संस्था आपली सामाजिक बांधिलकी जपत महत्त्वाचे कार्य करीत आहे. या संस्थेचे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील कार्य गौरवास्पद असे आहे,’ असे विचार मराठा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आणि प्रख्यात उद्योजक आप्पासाहेब गुरव यांनी बोलताना व्यक्त केले. जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या आंतरराष्ट्रीय सेवाभावी …

Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेने पार पाडावी : प्रल्हाद चन्नगिरी

संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर तसेच ग्रामीण भागात घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांची रितसर परवानगी घेणे आवश्यक असल्याचे संकेश्वर पोलिस निरीक्षक प्रल्हाद चन्नगिरी यांनी सांगितले. ते आज संकेश्वर पोलिस ठाण्यात पार पडलेल्या शांतता कमिटीच्या सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

2 मे रोजी दहावीचा निकाल; शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांची महिती

बेंगळुर : राज्यात एसएसएलसी परीक्षा सुरळीत पार पडल्या असून आता या परीक्षेच्या निकालाकडे सार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. या परीक्षेचा निकाल 2 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिली. बागलकोट आणि बेळगाव जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेण्यासाठी विजापूर दौर्‍यावर आलेले शिक्षणमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलत …

Read More »

मंत्र्यांनी कमिशन मागितल्याचा आरोप करणार्‍या बेळगावच्या कंत्राटदाराची आत्महत्या

बेळगाव : राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशनचा आरोप करणार्‍या कंत्राटदाराने उडुपी येथे लॉजमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. माझ्या आत्महत्येला मंत्री ईश्वराप्पा हेच जबाबदार असून माझ्या पत्नी व मुलांना संरक्षण द्या. त्यांची काळजी घ्या मदत करा, असेही त्यांनी मृत्यूपूर्वी माध्यमांना पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटले …

Read More »

श्री भगवान महावीर जनकल्याण महोत्सवानिमित्त बेळगावात गुरुवारी भव्य शोभायात्रा

बेळगाव : श्री भगवान महावीर स्वामींच्या 2621 व्या जन्म कल्याण महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक 14 एप्रिल रोजी बेळगावात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत चाळीस चित्ररथ त्याचबरोबर 100 बुलेट स्वार युवक-युवती सहभागी होणार आहेत. जन्म कल्याण महोत्सवानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक आणि स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जन्म …

Read More »

कर्नाटकात भाजपा पुन्हा सत्तेवर येईल : अरुण सिंह यांचा विश्वास

बेळगाव : काँग्रेसने लोक विश्वास गमावला आहे. काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन ठरला आहे. काँग्रेस कार्यकर्ते संभ्रमात आहेत. कर्नाटकात काँग्रेस विभागली गेली आहे. संपूर्ण देशातच काँग्रेसने आपले अस्तित्व गमावले आहे. पुढील काळात काँग्रेसला कर्नाटकात कदापिही यश मिळणार नाही. याउलट आगामी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पुन्हा एकदा बहुमताने सत्ता हस्तगत करेल, असा …

Read More »

पंढरपूर : चैत्री एकादशी! श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभार्‍यात 700 किलो द्राक्षांची आरास

पंढरपूर : चैत्रीशुध्द एकादशी निमित्त श्री विठ्ठलाची नित्यपुजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर यांच्या हस्ते करण्यात आली. तर श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य प्रकाश महाराज जवंजाळ यांच्या हस्ते सपत्निक करण्यात आली. चैत्री एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी गाभार्‍यात 700 किलो द्राक्षांची आरास करण्यात आली आहे. मंदिर समितीच्या वतीने …

Read More »